वीज चोरी आरोपीस ९१९६ रुपयांचा दंड ,दंड न भरल्यास तीस दिवस सश्रम कारावास

वीज चोरी आरोपीस ९१९६ रुपयांचा  दंड ,दंड न भरल्यास तीस दिवस सश्रम कारावास 

वेब टीम नगर : महावितरण कंपनीची वीज चोरुन वापरली म्हणून भरण्यात आलेल्या खटल्यातील आरोपीस  जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. चतुर यांनी दोषी धरून आरोपीस रक्कम रुपये ९१९६ दंड व दंड न भरल्यास तीस दिवस सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली.  या प्रकरणात फिर्यादी अभियोग पक्षातर्फे (महावितरण कंपनीतर्फे) ॲड. सुरेश लगड यांनी काम पाहिले. 

याबाबतची सविस्तर हकिकत अशी, महाराष्ट्र वीज वितरण कंपनी एम आय डि सी कक्षाचे कनिष्ठ अभियंता श्री प्रकाश रामचंद्र शेळके व त्यांचे सहकारी कर्मचारी यांनी दि.  4 जुलै 2013 रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास एम आय डि सी  अहमदनगर येथील रहिवासी किसन यशवंतराव डोंगरे यांच्या घरी वीज चोरी निर्मुलन  धाडसत्र कामे वीज चोरी तपासणी केली असता सदर इसमाने महावितरण कंपनीच्या मीटरला दिलेल्या सर्विस वायर कट करून तेथे दुसरी काळी वायर जोडून (बायपास करून) त्याचे घरातील वरील मजल्यावरील व पाठीमागील खोलीत काळ्या रंगाचा वायरचा आकडा टाकून वीज चोरी करताना आढळून आला.त्यामुळे सदर व्यक्तीचा वीजपुरवठा तोडून वीज चोरी साठी वापरलेली वायर दोन पंचांसमक्ष जप्त करून ताब्यात घेतलेली होती. तसेच वीज चोरीचा तपासणी अहवाल पंचनामा व जप्ती अहवाल जागेवरच तपासणी वेळी उपस्थित असलेली व्यक्ती किसन यशवंत डोंगरे यांचे भाडेकरी यांनी सही करण्यास व तो घेण्यास नकार दिला.

सदर प्रकरणातील आरोपी यांनी ४४३ किलोवॅट विजेचा घरगुती वापरासाठी बेकायदेशीर वापर केल्याचे प्रत्यक्ष आढळून आले.त्यामुळे आरोपींनी अप्रामाणिकपणे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महावितरण कंपनीच्या विद्युत प्रणालीशी अनधिकृतपणे छेडछाड करून चोरी केल्याचे विद्युत कायदा कलम १६५ व १३८ अन्वये गुन्हा केल्याने महावितरण कंपनीचे एकंदरीत रक्कम ५०७० चे नुकसान केले म्हणून सदर आरोपी विरुद्ध जिल्हा न्यायालयात खटला दाखल झालेला होता.त्यात साक्षीदार व फिर्यादी यांची साक्ष नोंदवून न्यायालयाने आरोपीस विद्युत कायदा कलम १३५(१) (ब) अन्वये दोषी धरून वरील प्रमाणे शिक्षा ठोठावली आहे.फिर्यादी अभियोग पक्षातर्फे  ॲड.सुरेश लगड यांनी काम पाहिले. 

Post a Comment

0 Comments