उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा !

उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा !

वेब टीम नवी दिल्ली :  उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरच्या विधानसभा निवडणुकीची औपचारिक घोषणा शनिवारी झाली. या घोषणेसह पाच राज्यांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.सर्व पाचही राज्यांत ७ टप्प्यांत निवडणुका होणार,१५ जानेवारीपर्यंत जाहीर सभांनाही मनाई राहील. व्हर्च्युअल प्रचारावर भर देण्याची सूचना,रोड शो, पदयात्रा, सायकल यात्रा यासाठी पूर्णपणे मनाई असेल,कोविडमुळे पाचही राज्यांत मतदानाची वेळ एक तासाने वाढवली,करोना स्थितीबाबत सर्व संबंधितांची मते विचारात घेतली आहेत, घरोघरी प्रचार करण्याठी केवळ पाच जणांनाच परवानगी असेल.

उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यातील मतदान १० फेब्रुवारी रोजी१४ रोजी दुसरा टप्पा ,२० रोजी ३रा टप्पा ,२३रोजी ४था टप्पा,२७ रोजी ५वा टप्पा ,३मार्च रोजी ६वा टप्पा ,७ मार्च रोजी सातवा टप्पा ,१० मार्चला मतमोजणी असा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.  

रोड शो आणि रॅलींवर बंदी

डिजिटल, व्हर्च्युअल, मोबाईलच्या माध्यमातून प्रचार करावा, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. शारीरिक प्रचारासाठी पारंपारिक माध्यमांचा वापर कमी करा.याशिवाय रात्री आठ ते सकाळी आठपर्यंत कोणताही प्रचार, जनसंपर्क राजकीय पक्षांना करता येणार नाही. विजयी मिरवणूक काढली जाणार नाही. विजयी उमेदवार दोन लोकांसह प्रमाणपत्र गोळा करण्यासाठी जातील.पक्षांना परवानगी दिलेल्या  ठिकाणीच सभा घेण्याची परवानगी असेल. सर्व पक्ष आणि उमेदवारांना वचन द्यावे लागेल की ते कोविड गाईड लाईनचे काटेकोरपणे पालन करतील.या सर्व निवडणुका कोविड  -१९ चे नियम पाळूनचं घेतल्या जातील. 

Post a Comment

0 Comments