इतिहासाच्या पाऊलखुणा : हुतात्मा छत्रपती शिवाजी (चौथे) - भाग १

इतिहासाच्या पाऊलखुणा : हुतात्मा छत्रपती शिवाजी (चौथे) - भाग १

छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली.  त्यांच्या नंतर या स्वराज्याला इंग्रजांच्या गुलामगिरीत मध्ये बांधून टाकायला या स्वराज्यसंस्थापक राजाचे वंशज कारणीभूत झाले. १८१२ साली कोल्हापूरच्या राजाने इंग्रजांशी तह केला आणि नामधारी राजा म्हणून मिरवू लागला.  परंतु त्यावेळेस सरदार ,जहागीरदार, शेतकरी आणि सर्वसामान्य लोक यांना ही मानहानी सहन झाली नाही . छत्रपती या नावा मधील दिव्यत्वा  पुढे त्यांच्या माना वाकलेल्या होत्या.  त्यांच्या भावना अर्पित होत्या  आणि त्यांचे विचार तीक्ष्ण भारावलेले होते.  लोकांची मने दुखावली गेली भावना प्रक्षोभीत झाल्या आणि असंतोष भडकून उठला.  सन १८४४ सालीया धुमसणाऱ्या आगीच्या ज्वाळा उफाळलेल्या आणि करवीर प्रांताच्या सरंजामदारानी,गडकर्‍यांनी, आम जनतेने सार्वत्रिक उठाव केला.  हा उठाव म्हणजे कोल्हापूर सरकारच्या विरुद्ध असमाधानी प्रजेने ,रयतेने केलेले बंड नव्हते तर इंग्रज सत्तेविरुद्ध तो सार्वजनिक उठाव  होता. 

 इंग्रजांनी आपल्या लष्करी बळाच्या जोरावर हे बंड चिरडून टाकले आणि आपली क्रूर मिठी राज्याच्या गडाला मायावी पणे हसत हसत घट्ट केली.  इंग्रजांचा कारभारी सर्व अधिकारी म्हणून दरबारी दाखल झाला.  राजा नामशेष झाला.  सर्व खजिना कारभाऱ्याच्या  स्वाधीन झाला आणि राजा कवडीला देखील महाग झाला.  हे सर्व पाहून राजाला प्रतीपरमेश्वर मानणारे लोक मनोमनी संतापाने जळू लागले.  अशा अवस्थेत काही वर्षे गेली आणि उत्तर हिंदुस्थानात झाशीच्या राणीने क्रांती युद्धाचे रणशिंग फुंकले . त्याचे पडसाद  तातडीने करवीर प्रांतात तीव्रतेने उठले.  लोकांची मन धगधगत  होती कोल्हापूरचा राजाचा धाकटा  भाऊ चिमा साहेब उफाळ्या तेजाचा तरुण बंड करुन उठला.  लोकांनी साथ दिली आणि इंग्रजांचे राज्य उलथून टाकण्याचा क्षण येऊन ठेपला.  परंतु दुर्दैवाने इंग्रजांनी उठाव चिरडून टाकला. जनता नामोहरम झाली आणि इंग्रजांनी चिमासाहेबाला कराचीत स्थानबद्ध  केले.  एकलकोंड्या  अवस्थेत११ वर्षे झिजून झिजून तो तेथे मरण पावला. इंग्रजांची मगरमिठी आणखीं घट्ट आवळली गेली. आणी कोल्हापूरचा राजा म्हणजे एक नामधारी दिखाऊ बुजगावणे बनला .  

         काही वर्षे उलटली १८७० साली राजाराम महाराज ईटाली मध्ये मरण पावले . त्यांना संतां नसल्याने  दत्तकाचा प्रश्न उद्भवला भोसले कुळातील सात मुलांची पाहणी राजस्त्रिया आणी इंग्रज पॉलिटीकल एजंट  यांनी केली . यामधून दिनकरराव सावर्डेकर यांचा मुलगा नारायण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.  त्यावेळी ते आठ वर्षांचे होते.  ही निवड करतांना पोलिटिकल एजंट म्हणतो हा मुलगा बुद्धिमान आणि प्रकृतीने उत्तम आहे.  त्याचा स्वभाव शांत आणि वागणे भारदस्तपणाचे आहे . सुमारे १०-११ महिन्यांनी मुंबईच्या गव्हर्नर ने मंजुरी दिली आणि २२-१० -१८७१ रोजी विजयादशमीच्या मुहूर्तावर दत्तक समारंभ पार पडला आणि चौथे छत्रपती शिवाजी महाराज यांची कारकीर्द सुरू झाली.  या बालकाला शिकवण्यासाठी खास शिक्षक नेमले सवंगडी म्हणून सरदार पुत्र जमवले गडकऱयांनी  मैदानी व मर्दानी खेळ शिकवले.  त्याचप्रमाणे निरनिराळ्या ठिकाणी सहली काढून त्याला त्याची माहिती दिली.  मात्र हे करताना त्याला गुलामच बनवायचा हा दृष्टिकोन त्यांनी कायम ठेवला होता . 

शारीरिक आणि मानसिक या दोन्ही आघाड्यावर हा बालराजा विकसू लागला.  जनतेशी त्याचा संबंध आला.  राजा म्हणजे आपला देव या सर्वश्रेष्ठ भावनेने वेडावलेली  जनता या राजबिंड्या बाळराजाची प्रगती पाहून  निश्चितपणे सुखावून गेली . १८७३ सालच्या नोव्हेम्बर महिन्यात मुंबईला व्हॉईसरायचा दरबार भरला राजांनी आपल्या भावना व्यक्त कराव्यात अशी महाराणी सकवारबाई सावत्र दत्तक मातोश्री यांची फार इच्छा होती.  परंतु राजांचे वय लहान व शिक्षण अपुरे आहे अशी शुल्लक कारणे दाखवून त्यांना ही संधी नाकारण्यात आली.  त्यामुळे हे उमदे बालक आणि त्याचा परिवार खुपच  नाराज झाला.  मात्र अँडरसन आपल्या अहवालात म्हणतो महाराजांचे शैक्षणिक प्रगती चांगली होती.  हॉमिक यांच्या मतावरूनही एकंदरीत परिस्थिती अतिशय चांगली असल्याचे दिसून येते. 

 १८७५ नोव्हेंबर महिन्यात प्रिन्स ऑफ वेल्स मुंबईला आले.  दरबारात महाराजांची व त्यांची भेट झाली परस्परांनी एकमेकांना मौल्यवान भेटी दिल्या. त्यानंतर राजे गोवा मार्गे कोल्हापूरला परतले १८७६ साली  दक्षिण भारतात फार मोठा दुष्काळ पडला.  कोल्हापूर राज्यात फारच वाईट परिस्थिती ओढवली , दुष्काळी कामे काढण्यात आली.  अन्नछत्रे घालण्यात आली .  दुष्काळ निवारणाच्या कामासाठी सर्वत्र अधिकारी गुंतून गेले कामाची पाहणी करायला मुंबईचे गव्हर्नर सर रिचर्ड टेंपल यांनी दोन वेळा दौरा केला . लोकांची परिस्थिती फारच हलाखीची झाली होती.  त्या काळात जनतेला दिलासा देण्यासाठी महाराजांनी आपल्या कडून पराकाष्ठेचा  प्रयत्न करून हातभार लावला.  रयतेच्या दुःखात सहभागी होणाऱ्या आणि संकटकाळी धाव घेणाऱ्या या राजाबद्दल लोकांना अपरंपार अभिमान वाटला असणार यात शंकाच नाही.  जनताभिमुख कामाची बक्षिसी म्हणून विक्टोरिया महाराणीने दिल्ली दरबारात के सी एस आय ही तत्कालीन बहुमानाची पदवी ,मानचिन्ह ,निशाण बहाल करून राजांच्या कार्यावर शिक्कामोर्तबच केले . या सन्मानाचा खास समारंभ दरबार भरवून कोल्हापूरला जानेवारी १८७८ मध्ये झाला.  मे महिन्यात महाराजांचा विवाह मोठ्या थाटामाटाने पार पडला. 

भाग १ क्रमशः 

Post a Comment

0 Comments