स्वराज्य संकल्पक शहाजीराजे
राजमाता जिजाऊसाहेब यांच्या नशिबी शहाजीराजांचा सहवास नव्हता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि माहेरचा पण आधार तुटला होता. याही परिस्थितीत या बाल शिवबाला तळहाताच्या फोडाप्रमाणे शिवनेरी किल्ल्यावर सांभाळत होत्या.शहाजीराजांनी जिजाऊ साहेब व शिवबा यांना सांभाळण्याचे काम आपले विश्वासू मलठणकर दादोजी कोंडदेव यांच्याकडे सोपविले.
दादोजी कोंडदेव हे शिवबाला मावळच्या खोऱ्याची माहिती होण्यासाठी पायी घेऊन फिरत होते व त्यांना डोंगर दऱ्याखोऱ्यांची माहिती करून देत होते.
बाळराजे दहा वर्षांचे झाल्यावर मुधोजी निंबाळकर यांची कन्या सईबाई हिच्याशी त्यांचा शके १५६२ रोजी विवाह झाला. शहाजीराजे त्यांच्या लग्नाला येऊ शकले नाहीत परंतु त्यांनी बंगळूर बघून एक खलिता पाठवला की, पावसाळा संपल्यावर जिजाऊ ,शिवबा आणि दादोजी पंत त्यांना घेऊन आपण भेटीला येणे.सई-शिवबा यांच्या लग्नाला येऊ शकले नाहीत परंतु त्यांनी आपल्या तुकाबाई या पत्नीच्या ओळखीने अंबारीतून वरात काढून शिवबाचे धूमधडाक्यात दुसरे लग्न लावले.दीड-दोन वर्षांनी जिजाबाई बाल व शिवबा पुण्यास येण्यास निघाले त्यावेळेला शहाजीराजांनी पुण्याची जहागिरी कागदोपत्री शिवबाच्या नावे करून दिली. त्यामुळे शिवबा पुण्याला आल्यानंतर स्वराज्यनिर्मीतीच्या कामाला लागले.ते गड-किल्ले घेऊ लागले.त्यासाठी ते मोहिमा काढीत होते. त्यामध्ये त्यांनी सैनिकांना ताकीद दिली कि मोहिमे मध्ये स्त्रिया ,मुले, वृद्ध आणि मशिदी यांना त्रास होईल असे वागावयाचे नाही.या प्रकारच्या बातम्या शहाजी राजांच्या कानावर जात होत्या. त्या वेळेला आपल्या मुलाचा पराक्रमाच्या बातम्या ऐकून खूप आनंद होत असे.आणि आपल्या पत्नीचे खूप कौतुक वाटत असे.
त्यामुळे त्यांची शिवबाला भेटण्याची इच्छा झाली. त्याप्रमाणे त्यांनी जेजुरी ला भेट घेण्यासाठी निरोप पाठविला.त्यांची व शिवबाची बारा वर्षांनी भेट होणार होती.त्यामुळे "काश्या"च्या भांड्यात तूप ओतून त्यात प्रतिबिंब पाहून या प्रथेप्रमाणे त्यांनी एकमेकांचे मुखावलोकन काश्याच्या भांड्यात करून शहाजीराजे दोन महिने जिजाऊ व शिवबा बरोबर राहिले.
शहाजीराजांनी मराठ्यांचे साम्राज्य कर्नाटकात नावारूपाला आणले.शहाजीराजांचे राहणे वागणे बोलणं एखादा स्वतंत्र राज घराण्या सारखे होते.शाहीर भुपाळ्या गाऊन त्यांना उठवत असत. विश्वनाथ भट वगैरे ब्राह्मण उच्च स्वरात संस्कृत मध्ये स्मरण व पुण्याहवाचन करून राजाला दिवस सुखात व आनंदात जावो याविषयी देवाजवळ प्रार्थना करीत असत.शहाजीराजे बिछान्यातून उठून अंगणात येत आणि शिव, विष्णू ,खंडोबा, ब्रह्मदेव, इंद्र यांचे दर्शन करुन चारी दिशांचे अवलोकन करीत.त्यावेळेला जंगम लोक, शंखध्वनी, गुरव शंका फुकीत आणि घडशी सनई चौघडा वाजवून मंगल नाद करीत.
ऐरावत, गाय, ब्राह्मणी, वर्धमान मनुष्य, असे शुभशकुन राजां समोरून जात होते. तर घोडेस्वार त्यांची कवायत दाखवत होते. नंतर औदुंबराचे दर्शन घेऊन राजवैद्य त्यांची नाडी तपासून घेत आणि शहाजीराजे स्नान करण्यासाठी जात असत. स्नानसंध्या झाल्यावर राजे रोज दरबारात जात होते. शहाजीराजे आपल्या संस्कृतीला खूप महत्व देत होते.युद्धशास्त्र, नीतिशास्त्र,संस्कार, समाजाविषयी आदर यांना फार महत्त्व देत होते व ते स्वतः या गोष्टी अमलात आणत होते.
युद्धतंत्र विशेष सांगायचे . तर त्यांचा भातोडीचा रणसंग्राम प्रसिद्ध आहे. मोगल व निजामशाही यांच्यामध्ये भातवडी ला झालेल्या या संग्रामा मध्ये शहाजीराजांनी प्रथम गनिमी कावा वापरून रात्रीतुन भातवडीचा तलाव फोडून मोगल सैन्याची दाणादाण उडवून दिली होती. आणि त्या रणसंग्रामात विजय मिळवला होता. म्हणून त्यांना "आदर्श राजे" म्हणत असत. २३ जानेवारी सन १६६४ मध्ये या राजांना देवाज्ञा झाली.त्यांच्या पवित्र स्मृतीस त्रिवार अभिवादन.
लेखक नारायण आव्हाड :
9273858457
संदर्भ: संग्रहालय लायब्ररी
अहमदनगर
0 Comments