सुवर्णा कोतकर यांचा जामिन मंजूर

सुवर्णा कोतकर यांचा जामिन मंजूर 

वेब टीम नगर : अहमदनगर महापालिका पोटनिवडणुकीनंतर केडगाव येथे दोन शिवसैनिकांची हत्या झाली होती. या घटनेत भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डिले  यांची ज्येष्ठ कन्या तथा अहमदनगर महापालिकेतील माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. केडगाव दुहेरी हत्याकांडातील आरोपी असलेल्या सुवर्णा कोतकर यांना जिल्हा सत्र न्यायालयाने आज अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. केडगाव येथे दोन शिवसैनिकांची हत्या करण्यात आली होती या हत्याकांडात सुवर्णा कोतकर यांचे नाव पोलिसांच्या तपासात पुढे आले होते. या घटनेनंतर सुवर्णा कोतकर या फरार होत्या.

आज जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जिल्हा न्यायाधीशांनी सुवर्णा कोतकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात ॲड.महेश तवले, ॲड.संजय दुशिंग, ॲड.विवेक म्हस्के यांनी कोतकर यांची न्यायालयात बाजू मांडली.

अहमदनगर महापालिका पोटनिवडणुकीनंतर केडगावमध्ये 7 एप्रिल 2018ला शिवसेनेचे पदाधिकारी वसंत ठुबे व संजय कोतकर यांची हत्या झाली होती. या प्रकरणातील आरोपींकडून सुवर्णा कोतकर यांच्या बद्दल माहिती तपास करणाऱ्या सीआयडीच्या पथकाला मिळाली होती. त्यामुळे सीआयडीने सुवर्णा कोतकर यांचे नाव या गुन्ह्यात नोंदविले. तेव्हा पासून सुवर्णा कोतकर या फरारी होत्या.या पूर्वीही त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र तो अर्ज फेटाळण्यात आला होता. आरोपी कोतकरने 2 जानेवारीला पुन्हा जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता.

या अर्जावर सीआयडी आणि सरकारी वकिलांनी म्हणणे मांडले असता मंगळवारी या प्रकरणाची सुनावणी झाली होती. दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सुवर्णा कोतकरला काही अटींवर अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.महाराष्ट्र सोडायचा असल्यास परवानगी घ्यावी, पासपोर्ट जमा करावा, या अटींवर न्यायालयाने एक लाख रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. आरोपी सुवर्णा कोतकरच्यावतीने न्यायालयात ॲड. विवेक म्हसे आणि ॲड. महेश तवले यांनी बाजू मांडली.

Post a Comment

0 Comments