पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करून लुटले

पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करून लुटले 

वेब टीम नगर : दुचाकीची धडक लागल्याच्या कारणातून पोलिस कर्मचार्‍याला मारहाण करत त्यांच्याकडील 20 हजार रूपयांची रक्कम व 10 हजार रू. किंमतीचा मोबाईल काढून घेतला. चांदणी चौकातील महालक्ष्मी मंदिराच्या समोर ही घटना घडली. मुख्यालयात नेमणूक असलेले अदिनाथ दिनकर शिरसाठ (रा. आष्टी जि. बीड) असे लुटमार झालेल्या पोलिस कर्मचार्‍यांचे नाव आहे.

 त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून श्याम बाबासाहेब जाधव, रोहन राजु जाधव (दोघे रा. निंबोडी ता. नगर) व अनोळखी सहा जणांविरूध्द कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजि.नं. 26/2022 दरोड्याचा (395) दाखल करण्यात आला आहे.पोलिस कर्मचारी शिरसाठ हे त्यांच्या दुचाकीवर चांदणी चौकातून जात असताना महालक्ष्मी मंदिराच्या समोर दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणातून त्यांचा व जाधव यांचा वाद झाला. या वादात आठ जणांनी पोलिस कर्मचारी शिरसाठ यांना मारहाण केली. त्यांच्याकडील 20 हजार रूपये व मोबाईल काढून घेतला असल्याचे फिर्यादीत पोलीस कर्मचारी शिरसाठ यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments