महिलेची निर्घृण हत्या : खुनी, महिलेचे शिर घेऊन पसार
वेब टीम माथेरान : माथेरान मधील इंदिरानगर परिसरामध्ये एक महिला पर्यटकाची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे या महिलेचा मुंडके हत्या करणाऱ्यांने कापून नेले असल्याने परिसरामध्ये दहशतीचं वातावरण आहे. माथेरान मधील इंदिरानगर परिसरामध्ये अनेक जण लॉजिंग व्यवसाय करीत आहेत . अशाच एका ठिकाणी ही घटना घडली असून शनिवारी या ठिकाणी एक जोडपे राहण्यासाठी आले होते . नेहमी प्रमाणे लॉजिंग मालकाने त्यांची नावे रजिस्टर मध्ये लिहून त्यांना खोली भाड्याने दिली होती व सकाळी जेव्हा या पर्यटकांना पाहण्यासाठी गेले असता महिलेचे खाटे खाली निर्वस्त्र अवस्थेत आणि शिर गायब होते.
सदर महिलेस अतिशय निर्घृण पणे मारण्यात आले. असून खुनाचे कोणतेही पुरावे मागे राहणार नाही याची पुरेपूर खबरदारी घेतल्याचे प्रत्यक्षदर्शी चे म्हणणे असून धडापासून वेगळे करून धड निर्वस्त्र अवस्थेत खुनी तेथेच सोडून गेला आहे. तर महिलेचे शिर व कपडे सोबत घेऊन जाताना खोलीतील रक्तही पुसले असल्याचे दिसून येते. ही घटना समोर आल्यानंतर दोघांची ओळखपत्र तपासले असता रूम घेताना दिलेली माहिती खोटी असल्याचे प्राथमिक तपासणीत आढळून आले आहे. दोघांची नावे व पत्ता खोटा असल्याचा संशय आहे.
0 Comments