कोचीत मॉडेलवर सामूहिक बलात्कार

कोचीत मॉडेलवर सामूहिक बलात्कार 

वेब टीम कोची : केरळमधील कोची येथील एका मॉडेलवर सामूहिक बलात्कार झाल्याच्या वृत्ताने खळबळ उडवून दिली आहे.  या 27 वर्षीय मॉडेलने   स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे . महिलेने केलेल्या तक्रारीनुसार कन्नकडच्या येथील हॉटेलमध्ये तीन जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. 

तिने फिर्यादीत म्हटले आहे कि,  आरोपीने तिच्या ड्रिंक मध्ये काहीतरी मिसळले होते, आणि नंतर रूमला लॉक करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.  या दरम्यान आरोपींनी अनेक व्हिडिओ बनवले असून ते  शेअर करण्याची धमकी दिली आहे.  सामूहिक बलात्कार झालेली महिला केरळच्या मलप्पुरम येथील रहिवासी आहे.  ती आरोपीच्या बोलवण्यावरून कोची येथे गेली होती.  स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक आणि दोन डिसेंबर रोजी मॉडेलवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप असलेले तीनही आरोपी ही मॉडेलच्या ओळखीचे होते.  सालीनं नावाच्या आरोपीच्या पुढाकाराने तिला या हॉटेलमध्ये बोलावण्यात आले होते.  मॉडेलच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एकाला अटक केलीआहे . 

 या प्रकरणाचा तपास करणाऱ्याच्या म्हणण्यानुसार त्यांनी पीडित महिलेला न्यायालयात हजर करून तिचा जबाब नोंदवून घेतला आहे . याचबरोबर त्यांनी हॉटेल मालक आणि व्यवस्थापकाची ही चौकशी केली आहे आणि अजूनही दोन आरोपी फरार आहेत पोलिसांचा तपास घेत आहेत. 

Post a Comment

0 Comments