रात्र धुक्याची सरली अन....
वेब टीम नगर : दिवसभर ढगाळ आणि पावसाची रिपरिप पडत असल्याने पडलेली थंडी असं कंटाळवाणं वातावरण होतं. इतक्यात रात्री नऊच्या दरम्यान निसर्गानं धुक्याची दुलई नगरकरांवर पसरली, वातावरण बदललं.
इतकं धुकं पाहिल्यावर नगरकरांना ही रस्त्यावर फिरण्याचा मोह आवरला नाही. अगदी स्वतः पासून पाच दहा फुटावरच काही दिसेना असं वातावरण ,त्यात पडलेली थंडी गुलाबी वाटू लागली. नगरकर चक्क रस्त्यावर फिरून धुक्याची अन थंडीची मजा घेऊ लागले. दिल्ली गेट परिसरात दूध , कुल्फी विक्री करणाऱ्या गाड्यांवर लोकांची गर्दी जमू लागली. धुक्यात गरम दुधाच्या कुणी आस्वाद घेत होते , तर कोणी कुल्फीच्या गाडीवर गुलाबी थंडीत थंडगार कुल्फी चा आनंद घेताना दिसत होते . अर्थात हे सर्व करताना दाट धुक्यातून गाड्या चालवतानाही विशेष काळजी घेतली जात होती. रात्री उशिरापर्यंत ही धुक्याची दुलई दाट होती, मात्र मध्यरात्री नंतर ही दुलई विरळ होत गेली. आजची सकाळ मात्र थोडीशी उशिरा का होईना पण सोनेरी किरणं घेऊन उगवली.
0 Comments