जिल्हा वाचनालयात विक्रम राठोड यांच्या प्रगती पॅनेलची बिनविरोध फेरनिवड

जिल्हा वाचनालयात विक्रम राठोड यांच्या प्रगती पॅनेलची बिनविरोध फेरनिवड

वेब टीम  नगर : अहमदनगर जिल्हा वाचनालयाच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रा.शिरिष मोडक व विक्रम राठोड यांच्या ‘नेतृत्वखालील प्रगती पॅनेलची फेर निवड बिनविरोध झाली. ही फेरनिवड 2021-2026 सालासाठी झालेली आहे.

 वाचनालयाची वार्षिक सर्वसाधारण सभा लोकमान्य टिळक सभागृहात वाचनायाचे अध्यक्ष प्रा.शिरिष मोडक यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडली. या सभेस प्रगती पॅनेलची निवड करण्यात आली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून माजी सरकारी वकिल अ‍ॅड.भीमराव काकड यांनी काम पाहिले. त्यांना अ‍ॅड.गणेश वरंगळे यांनी सहकार्य केले.

 प्रगती पॅनेलमध्ये विक्रम राठोड, प्रा.शिरिष मोडक, शिल्पा रसाळ, अजित रेखी, तन्वीर खान, डॉ.राजा ठाकूर, अनिल लोखंडे, प्रा.मेघा काळे, राहुल तांबोळी, अनंत देसाई, दिलीप पांढरे, प्रा.ज्योती कुलकर्णी, संजय चोपडा, डॉ.शैलेंद्र पाटणकर, किरण आगरवाल यांचा समावेश आहे. या सर्व उमेदवारांची पुढील पाच वर्षांसाठी फेरनिवड झाली. सर्वांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

 याप्रसंगी प्रा.शिरिष मोडक म्हणाले, जिल्हा वाचनालयाला मोठी परंपरा आहे, ही परंपरा कायम ठेवत, वाचनालयाच्या लौकीकात भर टाकण्याचा आपला प्रयत्न राहील. स्व.अनिलभैय्या राठोड यांचेही वाचनालयाच्या विकासात मोठे योगदान राहिले आहे, त्यांचे कार्य यापुढेही सुरु ठेवू असे सांगितले.

या सभेस संस्कार भारतीचे सचिव विलास बडवे, क्रांतीताई अनभुले, भरतभाई शाह, लक्ष्मीनारायण रोहिल, विश्वास काळे उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments