वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून तलाठ्याची आत्महत्या

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून तलाठ्याची आत्महत्या 

वेब टीम औरंगाबाद :  एका 36 वर्षीय तलाठ्याने आपल्या वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या कामाची छळवणूक आणि मानसिक त्रासाला कंटाळून गळाफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. लक्ष्मण नामदेव बोराटे असे आत्महत्या करणाऱ्या तलाठ्याचे नाव आहे.

लक्ष्मण बोराटे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमुळे अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचं समोर आलंय. चिठ्ठीमध्ये त्रास देणाऱ्यांमध्ये १२ ते १३ अधिकारी आणि कर्मचारी, महिला कर्मचाऱ्यांचीही नावे असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबाद शहरातील सातारा परिसरातील रहिवाशी लक्ष्मण नामदेव बोराटे हे अपर तहसील कार्यालयात तलाठी पदावर कार्यतर होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील आवक जावक विभागाला त्यांची नेमणूक होती. त्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे इतरही काही कामकाजाची जबाबदारी होती. गेल्या काही महिन्यांपासून त्यांना  मानसिक त्रासाने ग्रासले गेले होते. बोराटे यांनी या त्रासाला कंटाळून रविवारी सकाळी घरी कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली.या घटनेची माहिती नातेवाईकांना मिळताच त्यांनी त्याला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. चिठ्ठीत त्रास देणाऱ्यांमध्ये १२ ते १३ जणांची नावे कार्यालयात चुकीचे कामे आणि जास्तीचे कामे करण्यास भाग पाडणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे या चिठ्ठीत लक्ष्मण बोराटे यांनी लिहून ठेवली आहेत. छळ करणारे १२ ते १३ जणांची नावे असून त्यात काही महिलांचाही सहभाग आहे. चिठ्ठीत नेमके काय आहे हे बोराटे यांच्या नातेवाईकांना पोलिसांनी वाचून दाखविली आहे.


Post a Comment

0 Comments