ओमिक्रॉन म्हणजे काय? कसा लागला या वेरिएंटचा शोध?

काय आहे ओमिक्रॉन ? असा लागला या वेरिएंटचा शोध?

वेब टीम बोत्सवाना :  आफ्रिकेतून घेतलेल्या B.1.1529 च्या नमुन्यांमध्ये आढळून आले की त्याच्या स्पाइक प्रोटीनमध्ये 30 हून अधिक म्यूटेशन्स झाले. WHO च्या मते, इतर वेरिएंटच्या तुलनेत, ओमिक्रॉन वेरिएंटने पुन्हा कोविडची लागण होण्याची शक्यता जास्त आहे.

या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. याबाबत, दक्षिण आफ्रिकेतील शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. ओमिक्रॉन वेरिएंट कुठे निर्माण झालाय, हे अद्याप स्पष्ट नाही. पण दक्षिण आफ्रिकेतील शास्त्रज्ञांनी या नवीन कोरोना वायरस वेरिएंटचा शोध लावला आहे. नंतर, हाँगकाँग आणि बोत्सवाना देशातल्या प्रवाशांमध्येही हा कोरोना वायरस वेरिएंट आढळला.

WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. या वेरिएंटची तीव्रता कळताच अनेक देशांनी हवाईसेवा निर्बंध लावण्यास सुरुवात केलीये, स्टॉक मार्केट कोसळले आहे आणि नेमका धोका शोधण्यासाठी शास्त्रज्ञ आपत्कालीन बैठका घेत आहेत. ओमिक्रॉनला डेल्टा वेरिएंटपेक्षा जास्त धोकादायक मानले जात आहे.

दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोना विषाणूचे नवीन प्रकाराला B.1.1529 असे ओळखले जात होते. नंतर WHO ने त्याला ‘Omicron’ असे नाव दिले. हा ग्रीक शब्द आहे (Omicron is a Greek word). WHO ने सांगितले की ज्या पहिल्या नमुन्यातून ओमिक्रॉनची पहिली केस आढळली होती, त्याची चाचणी 9 नोव्हेंबर रोजी करण्यात आली होती. ओमिक्रॉनचे केसेस आता बेल्जियम, हाँगकाँग, इस्रायल आणि दक्षिण आफ्रिकेतील प्रवाशांमध्ये सापडत आहेत.

बोत्सवाना, आफ्रिकेतून घेतलेल्या B.1.1529 च्या नमुन्यांमध्ये आढळून आले की त्याच्या स्पाइक प्रोटीनमध्ये 30 हून अधिक म्यूटेशन्स झाले. WHO च्या मते, इतर वेरिएंटच्या तुलनेत, ओमिक्रॉन वेरिएंटने पुन्हा कोविडची लागण होण्याची शक्यता जास्त आहे.

या नवीन वेरिएंटची भारतात आतापर्यंत एकही केस समोर आलेली नाही. मात्र, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सरकार आवश्यक त्या उपाययोजना करत आहे. खबरदारी म्हणून भारताने ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, मॉरिशस, बांगलादेश, बोत्सवाना, झिम्बाब्वे, न्यूझीलंड, सिंगापूर, हाँगकाँग आणि इस्रायल या देशांना ‘high risk’ देशांच्या यादीत टाकले आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या तज्ञांनी सांगितले की या वेरिएंटने अधिक गंभीर किंवा असामान्य आजार होतो असे कोणतेही संकेत नाहीत. युनिव्हर्सिटी ऑफ केंब्रिजमधले तज्ञ शेरॉन पीकॉक म्हणाले की, विद्यमान अँटी-कोविड लस नवीन वेरिएंटविरोधात किती प्रभावी आहेत हे तपासण्यात काही आठवडे जातील.

Post a Comment

0 Comments