'संप' संपला ? एस टी पुन्हा धावणार ?

 'संप' संपला ? एस टी पुन्हा धावणार ?

वेब टीम मुंबई : गेले २१ दिवस सुरु असलेला एस ती कर्मचाऱ्यांचा संप आज यशस्वी वाटाघाटींनंतर मागे घेण्यात आला. यातील मुख्य मागणी जी विलीनीकरणाची होती. त्यात न्यायालयाने त्रीसदस्यीय समिती नेमली असून हि समिती १२ आठवड्यात मुख्यमंत्र्यांकडे आपला अहवाल सादर करेल त्या अहवालातील मसुद्याशी राज्य शासन सहमत असेल असे आश्वासन परिवहन मंत्री अनिल परब यांनी  पत्रकार परिषदेत दिले. या पत्रकार परिषदेत आ.सदाभाऊ खोत , आ गोपीचंद पडळकर आणि मंत्री उदय सामंत आदी. उपस्थित होते. 

समितीचा अहवाल यायला बराच कालावधी असल्याने आम्ही कर्मचार्यांसमोर आजूबाजूच्या राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या तुलनेत पगारवाढीचा प्रस्ताव दिला होता. त्याच बरोबर राज्यसरकारच्या कर्मचाऱ्यांना दिले जाणारे घर भाडे भत्ता आणि इन्क्रिमेंट एसटी कर्मचाऱ्यांनाही दिवाळी नंतर देण्याचे मान्य केले होते ते हीं  दिले जाणार आहे. तसेचं १ ते १० वर्ष कॅटेगरी मधील कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात ठोक ५ हजाराची वेतन वाढ,१०-२० वर्षांच्या कॅटेगरी मधील कर्मचाऱ्यांना ७.५ हजाराची वेतनवाढ  तर २० वर्ष व त्याहून अधिक वर्षाच्या कॅटेगरीत कर्मचाऱ्यांना २.५ वेतन वाढ देण्यात आली असून हि वेतन वाढ ४१ टक्क्यांएवढी आहे.एसटी च्या इतिहासात पहिल्यांदाच एवढी भरगोस वेतनवाढ देण्यात येणार आहे. 

तसेच आंदोलन काळातील निलंबनाबाबत बोलतांना परब म्हणाले कि जे कर्मचारी तातडीने कामावर रुजू होतील त्यांच्यावरील निलंबन तात्काळ मागे घेण्यात येईल असेही परब यांनी सांगितले एवढे करूनही संप मागे घेतला नाही तर शासन सर्वतोपरी उपाय करील असे त्यांनी सांगितले.       

आत्ताच परब ह्यांनी जी भूमिका मंडळी ती आम्ही आंदोलन स्थळी जाऊन एसटी कर्मचाऱ्यांना सांगू त्यानंतर साडेसात वाजता आम्ही आमची भूमिका स्पष्ट  करू असे आंदोलनाचे नेते सदाभाऊ खोत यांनी मांडली.   

Post a Comment

0 Comments