'विलीनीकरणा'च्या 'मृगजळा' मागे एस.टी कर्मचारी धावणार कुठपर्यंत !

'विलीनीकरणा'च्या 'मृगजळा' मागे एस.टी कर्मचारी धावणार कुठपर्यंत !  


नगर : महाराष्ट्र राज्यात सत्ता स्थापनेच्या खेळात भाजपा आणि त्यांच्या घटक पक्षांना शिवसेना,काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांनी आघाडी सरकार स्थापन करून त्यांचे मंत्रिपदाची मनसुबे धुळीस मिळविले.तेव्हापासून भाजपा व त्यांचे घटक पक्षाच्या नेत्यांनी महाराष्ट्रात अनेक मार्गांनी  केंद्राच्या मदतीने राज्यकारभारात अडथळे आणले.कोरोनाचे संकट असो किंवा एसटी कर्मचाऱ्यांचा संप.

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यास औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक विकासामध्ये एसटी कर्मचारी ,महामंडळ प्रशासनाचा सिंहाचा वाटा आहे. एसटी कर्मचारी यांच्या पगारात अन्य राज्यातील परिवहन महामंडळा पेक्षा सर्वोत्तम वेतन व पेन्शन योजना महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांना तातडीने देऊन विलीनीकरणाचा नंतर निर्णय घ्यावा. आज बससेवा सुरू व्हावी यासाठी मुख्यमंत्री आणि प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी जनतेतून मागणी होत आहे.

विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना जनतेला सहकार्य न करता अडवणुकीचे आणि 'खोटे बोल, पण रेटून बोलण्याचा' एक कलमी कार्यक्रम हाती घेतल्याने गेली दोन वर्षे सर्वसामान्य जनता केंद्रातील व महाराष्ट्रातील नेत्यांचा बेताल वर्तणुकीने त्रस्त झाली आहे. मागण्या मान्य झाल्या आणि दिवाळीपूर्वीच एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे घेऊन बसेस सुरू झाल्या. पुन्हा विलिनीकरणाचा मुद्दा पुढे करून राजकीय पक्षांनी एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी दिली.  'मृगजळाच्या' मागे धावायला एसटी कर्मचाऱ्यांना प्रवृत्त केलं.यापूर्वी एसटी आंदोलनात न दिसणारे, भागून घेणारे, संपकाळात कोणतीही आर्थिक मदत न देणारे 'नेते' आंदोलनात चमकू लागले.फक्त आमची निवडणुकीच्या मतांची बेगमी करायला; डोकी फिरवली जात आहेत.या संपात एसटी कर्मचारी संघटनांच्या नेत्यांची अस्तित्वही दिसून येत नाही. 


'प्रवाशांची सेवा' हेच मूलभूत ध्येय मानून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची स्थापना झाली.  महाराष्ट्रात गाव तिथे एसटी यातून जनसेवेचे जिव्हाळ्याचे नाते प्रवासी आणि एसटी कर्मचाऱ्यांचे निर्माण झाले.एसटी ची स्थापना सन १९४८ मध्ये झाली.  पहिली बस नगर-पुणे मार्गावर धावली आणि महामंडळाची त्यापाठोपाठ प्रत्येक गाव,तालुके,शहरांची समृद्धीकडे वाटचाल सुरू झाली.आज गेली ७४ वर्ष एसटी धावत आहे. आज ९३ हजार कर्मचाऱ्यांचे कष्ट,आपुलकीची सेवा यतून एसटी महामंडळाचे प्रचंड साम्राज्य उभे राहिलेले दिसते आहे.उत्साही कार्यक्षम कर्मचाऱ्यांच्या एकजुटीने एसटी महामंडळ २४ तास अखंड सेवा यशस्वी पणे देत आहे.

आजपर्यंत चालक,वाहक,सुरक्षा कर्मचारी,व्यवस्थापक,आगार प्रमुख यांच्यात समन्वय आहे.काही वेळा प्रश्‍न,समस्या उभ्या राहिल्या असल्या तरी एकत्र येऊन कटुता,द्वेष,अडवणुकीचं वातावरण एसटी महामंडळात कधीच नव्हते.

 नोटबंदी,कोरोना महामारी यामुळे देशात अनेक समस्या निर्माण झाल्या.अनेकांच्या नोकऱ्या गेल्या.हजारो लहान-मोठे उद्योग बंद पडले.या सर्वाचा परिणाम एसटी महामंडळावर सुद्धा झाला. केंद्र सरकारनेही डिझेल-पेट्रोलचे दर वाढत असल्याने एसटीची आर्थिक नियोजन कोलमडून लागले.कोरोनाच्या महामारीत   लॉक डाऊन झाल्याने एसटी बसेस आगारात एकाच जागी उभ्या होत्या.कोट्यावधी रुपयांचा तोटा सहन करीत महामंडळ संकट कमी होण्याची वाट पाहत होते. या संकटात आघाडी सरकारने महामंडळाला कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी पैसे दिले.वाढती महागाईने अन्य क्षेत्रांप्रमाणे महामंडळाचे कर्मचारीही त्रस्त झाले होते.तीन वर्षांपूर्वी प्रमाणेच अचानक एसटी संघटनांनी याहि दिवाळीत कमाईच्या दिवसात संप पुन्हा सुरु केला.

  त्यांची मागणी मान्य होऊन संप मागे घेतला गेला व काही विघ्नसंतोषी राजकीय संघटनांच्या नेत्यांनी चिथावणी देऊन संपूर्ण सुरू केला.आज १९ दिवस संप चालू असून बसेस एकाच जागी उभ्या आहेत.  
एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेच्या नेत्यांकडे दिले होते की, जनतेच्या ज्या नेत्यांना पाठिंबा नाही, विश्वास नाही अशा भडकाऊ आणि  दुसऱ्यांच्या आंदोलनात घुसखोरी करून एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात स्वार्थ पाहणाऱ्यांना संधी देऊन काय साध्य होणार.


एसटी कर्मचाऱ्यांच्या तीन वर्षांपूर्वी अचानक दिवाळीत घडलेल्या संपात सत्ताधारी भाजप नेत्याने दिलेली वागणूक कर्मचारी विसरले नसतील. तेच आज एसटी संपात आंदोलनस्थळी येऊन चिथावणीखोर भाषणे करीत आहेत. त्या  कोट्याधीश नेत्यांनी आंदोलनस्थळी येऊन भाषणे केली.आर्थिक सहाय्य केले का? एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील मुलांना दिवाळीनिमित्त काय दिले?

एसटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबातील तरुणांना आज तातडीने दुसरीकडे चांगल्या पगाराची नोकरी मिळेल का? मुलांना, कुटुंबाला अडचणीत न आणता प्रवाशांचाही विचार करून पूर्ववत बससेवा सुरू करावी.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व प्रशासनाने कोरोना काळात एसटी कर्मचाऱ्यांना पगाराची रक्कम दिली.  आज एसटी कर्मचारी संघटनेला झुंजार, निस्वार्थी, कणखर नेतृत्व नसल्याने अन्य जनाधार नसलेल्या स्वयंभू नेते एसटी कर्मचारी आंदोलनात घुसखोरी करत आहेत. केंद्र सरकारने सरकारी सार्वजनिक उद्योगांची विक्री करीत आहेत. याची जाणीव ठेवून एसटीने खासगीकरणाकडे नेणारी वाटचाल तसेच गिरणी कामगारां सारखी अवस्था होऊ नये.संप लांबवत नेण्याचे कारस्थान 'संप मागे' घेऊन कर्मचाऱ्यांनी हाणून पाडावा. एसटी बस सेवा पूर्ववत सुरु करून शासनाकडे सातत्याने मागण्यांसाठी पाठपुरावा संघटनांच्या नेत्यांनी करावा.

जनतेच्या सेवेसाठी आमदार ... नगर :  फक्त आयुष्यातील पाच वर्षे पूर्ण काळ आमदार राहिलेल्या व्यक्तीला महिना ५० हजार रुपये पेन्शन मिळते.त्याचे निधन झाल्यावर त्याच्या पत्नीला पेन्शन मिळते.विद्यमान आमदारांना दरमहा ६७००० मूळ मानधन, महागाई भत्ता ९१,१२० इतर खर्च २८ हजार असे एकूण १ लाख ८६ हजार १२० रुपये प्रत्येक आमदाराला मिळतात.  एसटी, रेल्वे, काही वेळा विमान प्रवास, खाजगी रुग्णालयातील वैद्यकीय खर्च , महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीतून केला जातो.आमदारांच्या पगारासाठी वर्षाला ५०० कोटी खर्च, माजी आमदारांना पेन्शनसाठी १५० कोटी रुपये शासनातर्फे ठरलेल्या तारखेलाच बँकेत जमा होतात.  
 प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी कर्मचारी ... एसटी कर्मचाऱ्यांचा पूर्णवेळ एसटी प्रवासालाच.सकाळी एसटी बस निघाली की दिवसभरात १० तास नोकरीत जातात घरी रात्री विश्रांती घेऊन पुन्हा निवृत्त होईपर्यंत हाच दिनक्रम पगार रुपये ६ हजार, ८ हजार, २४ हजार निवृत्तीवेतन अलीकडे २ हजार मिळतात.


      प्रकाश  निसळ 
    स्वातंत्र्य सैनिक 
उत्तराधिकारी संघटना
       अ .नगर 

Post a Comment

0 Comments