संदीप कुसळकर यांना सेवादीप पुरस्कार

संदीप कुसळकर यांना सेवादीप पुरस्कार 

वेब टीम नगर : युवकांच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल पुणे येथील रेलफोर फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा मानाचा सेवादिप पुरस्कार 2021 युवानचे संस्थापक अध्यक्ष संदिप कुसळकर यांना प्रदान करण्यात आला. 5 लाख रूपये व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी युवानचे सचिव सुरेश मैड, संचालिका वर्षा मुळे-कुसळकर व अविनाश बनकर उपस्थित होते.

संपूर्ण महाराष्ट्रातून ग्रामीण आणि आदिवासी विकास, शिक्षण, युवा सक्षमीकरण, विशेष-अपंग आणि वृद्ध व्यक्तींची आरोग्यसेवा, बालसंगोपन, शिक्षण आणि प्रामुख्याने शैक्षणिक संशोधनासाठी अथक सेवा करणार्‍या व्यक्ती अशा सामाजिक कार्यातील 250 संस्थाच्या सर्वेक्षणातुन विविध श्रेणींमधून 10 सेवादीप पुरस्कार प्राप्तकर्त्यांची निवड करण्यात आली.

या प्रतिष्ठित सेवादीप पुरस्कार मिळालेल्या दहा स्वयंसेवी संस्थांमध्ये युवान, ग्राम मंगल, दीपस्तंभ फाऊंडेशन, इन्फंट इंडिया, जीवन संवर्धन फाऊंडेशन, केअरिंग हँड्स फाऊंडेशन, आरंभ ऑटिझम फाउंडेशन, आपला परिवार वृद्धाश्रम, जीवनविद्या परिवर्तन ट्रस्ट, माई बालभवन आणि सामाजिक कार्यकर्ते अजय किंगरे आणि अनिल चाचर यांचा समावेश आहे. सर्व पुरस्कार विजेत्यांनी मान्यता आणि मिळालेल्या पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ज्यामुळे त्यांना त्यांचे उदात्त कार्य चालू ठेवण्यास मदत होईल.

युवान संस्थेमार्फत संदिप कुसळकर यांनी वंचित, गरजु घटकातील युवकांसाठी मोठी आव्हाने असूनही मागील सात वर्षात पथदर्शी कार्य केले. शिक्षण, रोजगारासोबत युवा पिढीला दिशा देण्यासाठी, त्यांना चारित्र्यशील, जबाबदार नागरिक बनविण्यासाठी युवानमार्फत विविध युवा विकास उपक्रम राबविण्यात येतात.

लॉकडाऊन काळातही युवानमार्फत जिल्हा शासकिय रुग्णालयास बेड, आय.सी.यू. साहित्य, एक्स रे मशीन आदी मेडिकल साहित्य मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केला. पाथर्डी ग्रामीण रुग्णालयासही युवान मार्फत अद्यावत व्हेंटिलेटर तातडीने उपलब्ध करण्यात आले.

त्यामुळे शेकडो जीव वाचले. कोविड पीडित मजुर, गरीब अशा तीन हजार नागरिकांना युवानमार्फत किराणा, जेवण, प्रवास, मास्क इ.ची मोफत सोय करण्यात आली. या सर्व सामाजिक कार्याची दखल घेऊन युवानला हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे.

सेवादीप प्लॅटफॉर्म सामाजिक संस्थेच्या गरजा आणि पूर्तता यांच्यातील अंतर कमी करण्यासाठीची एक सामाजिक चळवळ आहे. या मध्ये सर्व संस्था व दात्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन रेल्फोर फाउंडेशनने अध्यक्ष दीपक नाथानी यांनी या वेळेस सांगितले.

संदिप कुसळकर यांनी हा पुरस्कार युवानचे प्रेरणास्थान डॉ. एस. एन. सुब्बराव उर्फ भाईजी यांना अर्पण करून युवानच्या मागे खंबरीपणे उभे राहणार्‍या सर्व देशप्रेमी हातांचा हा गौरव असल्याची भावना व्यक्त केली.

रेलफोर फाऊंडेशन अंतर्गत सेवादीप हा देणगीदारांना स्वयंसेवी संस्थांशी जोडण्यासाठी एक ऑनलाइन देणगी प्लॅटफॉर्म आहे. जो तलावांचे खोलीकरण, आदिवासींसाठी कायमस्वरूपी पक्के घरे बांधणे, गावातील शाळांमध्ये शौचालये बांधणे, अनेक वृद्धाश्रम आणि अनाथाश्रमांसाठी सभागृह आणि उद्याने बांधणे यासारख्या विविध सामाजिक कल्याणकारी प्रकल्पांमध्ये आणि उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी आहे. लॉकडाऊन काळात मोठ्या प्रमाणावर अन्नाचे वाटप रेलफोर फाउंडेशनने केले.( फोटो-युवान )

Post a Comment

0 Comments