उमेदच्या महिला बचत गटांचे दीपावली प्रदर्शनास सुरुवात

उमेदच्या महिला बचत गटांचे दीपावली प्रदर्शनास  सुरुवात

वेब टीम नगर : जिल्हा परिषद, अहमदनगर व उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या वतीने दीपावली निमित्ताने महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू व फराळ यांचे विक्री प्रदर्शन जिल्हा परिषद प्रांगणात दिनांक २८ ऑक्टोबर २०२१ ते ०१ नोव्हेबर २०२१ दरम्यान आयोजित करण्यात आहे आहे. या विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन . राजश्रीताई चंद्रशेखर घुले पाटील जिल्हा परिषद अध्यक्षा यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती मा. श्रीमती मीरा पांडुरंग शेटे मीराताई शेटे, उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापकसोमनाथ जगताप, नगर तालुका पंचायत समिती चे सहाय्यक गट विकास अधिकारीसंजय केदारे उपस्थित होते. 

ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूहातील होतकरू महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी हे प्रदर्शन जिल्हा परिषदेच्या माध्यामातून आयोजित करण्यात आलेले आहे. उमेद अभियानातर्गत बचत गटांनी उत्पादित केलेल्या अस्सल व गुणवत्तापूर्ण वस्तू व खाद्यपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध आहेत. उमेदच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यामध्ये १४००० स्वयंसहायता गटाची स्थापना करण्यात आली असून त्या माध्यमातून विविध उपजीविकेचे उपक्रम सुरू करण्यात आले आहेत त्यामध्ये गटातील महिलांना खाद्यपदार्थ व इतर उपयोगी वस्तूंचे उत्पादन करत असतात. 

यावेळी जिल्हा परिषदेतील अधिकारी व पदाधिकारी यांनी उत्पादनांची खरेदी केली व गुणवत्तेबद्दल समाधान व्यक्त केले आहे.  सदर विक्री प्रदर्शनामध्ये महिला गटांनी उत्पादित केलेल्या रूचकर पापड, लोणचे, मसाले, पेढे, दीपावली फराळ, उटणे, शेवया इत्यादी चविष्ट पदार्थ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

या विक्री प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रुचकर खाद्यपदार्थ उपलब्ध होत असून दीपावलीनिमित्त जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचारी व अधिकारी वृंदाने या ठिकाणी खरेदी करावी असे आवाहन राजेंद्र क्षीरसागर,  मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अहमदनगर यांनी केले आहे. 

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नगर जिल्हा व्यवस्थापक -विपणन  अतुल चाटे व तालुका  व्यवस्थापक पंढरीनाथ ठाणगे, बाबासाहेब सरोदे, वैभव धनवटे,  ज्ञानेश्वर गव्हाणे  व प्रभाग समन्वयक वैभव मोहिते सतिश बोरुडे श्रीमती वृषाली नवले, सोनाली शिंदे,बाळासाहेब भोसले इतर सर्व स्टाफ यांनी मोलाचे सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments