शहीद अशफाकुल्ला खान फासावर जाणारे सर्वात

शहीद अशफाकुल्ला खान फासावर जाणारे सर्वात

कमी वयाचे स्वातंत्र्य सेनानी - प्रा.डाॅ.अब्दुस सलाम

वेब टीम नगर : देश इंग्रजांच्या गुलामीत आहे त्यांच्यापासून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपली काहीतरी जबाबदारी आहे. याची जाणीव तरुण व्यातच ठेवत अश्फाकुल्लाह खान, रामप्रसाद बिस्मिल व इतरांनी ककोरी कांड केला होता. तशीच जाणीव आजच्या युवा पिढीमध्ये देशासाठी निर्माण होण्याची अत्यंत आवश्यकता आहे. नवीन पिढीला काहीही ना करता फुकटमध्ये स्वातंत्र्य मिळाले म्हणून त्यांना देशासाठी बलिदान दिलेल्या शूरवीर व शहीदांविषयी फार आकर्षण राहिलेले नाही व आज शाळेमध्ये जो थोडाफार इतिहास शिकविली जातो, त्यामुळे त्यांना थोडेफार प्रचलित मोठे स्वतंत्र्य सेनानी आठवतात. घरातल्या मोठ्यांकडून त्यांना कधीच स्वतंत्र्य सेनानींबद्दल सांगितले जात नाही, म्हणून आजची युवा पिढी शहिदांना विसरत चालली आहे. शहिदांच्या जयंती-पुण्यतिथी साजरी केल्याने कमीत कमी त्यांच्या स्वातंत्र्य संग्रामातील बलदानाची आठवण होते.पालकांनी हे मुलांना सांगितले पाहिजे की शहीद अशफाकुल्ला खान फासावर जाणारे सर्वात कमी वयाचे स्वातंत्र्य सेनानी होते, असे प्रतिपादन मोहम्मद एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक प्रा. डॉ. अब्दुस सलाम सर यांनी केले.

मोहम्मदिया एज्युकेशन ससायटीच्या मौलाना आझाद उर्दू मुलींचे हायस्कूल, अध्यापक महाविद्यालयाच्या वतीने शहिद अश्फाकुल्ला खान यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्रथम त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पन करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मोहम्मदिया एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक प्रा.डाॅ.अब्दुस सलाम सर,कुतुबुद्दीन जनाब,मखदूम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान, मुख्याध्यापक फरहाना शेख, सय्यद नौशाद,जमीर शेख आदि उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरवात क़ुरान पठणाने झाली. यानंतर हायस्कूल व महाविद्यालया च्या विद्यार्थिनी सैय्यद जरीन,सय्यद सानिया, शेख सादिया, महेमिश,खान सिदरा यांनी शहीद अश्फाकुल्ला खान यांच्या जीवनाच्या थोडक्यात परिचय आपल्या वक्तृत्वातून करून दिला.

सूत्रसंचालन बहार अंजुम यांनी केले तर आभार तलमीज सैय्यद यांनी मानले.(फोटो -खान )


Post a Comment

0 Comments