लायन्स प्राईडची नुतन कार्यकारणी जाहीर
पदाधिकारीपदी महिलांना संधी
अध्यक्षपदी गगन वधवा, सचिवपदी रिध्दी धुप्पड तर खजिनदारपदी हरमीतकौर माखीजा यांची निवड
वेब टीम नगर : लायन्स क्लब ऑफ अहमदनगर प्राईडची नुतन कार्यकारणी नुकतीच जाहिर करण्यात आली. पदाधिकारीपदी महिलांना संधी देण्यात आली असून, क्लबच्या अध्यक्षपदी गगन वधवा सचिवपदी रिध्दी धुप्पड तर खजिनदारपदी हरमीतकौर माखीजा यांची सन २०२१-२२ या वर्षासाठी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
लायन्स क्लब ही जागतिक दर्जाची असलेली सेवाभावी संस्था आहे. या क्लबच्या माध्यमातून समाजातील प्रतिष्ठित व्यापारी, उद्योजक, डॉक्टर आदी विविध क्षेत्रातील व्यक्ती एकत्र येऊन सामाजिक योगदान देत आहेत. लायन्स प्राईडच्या वतीने शहरात वर्षभर विविध सामाजिक उपक्रम चालू असतात. क्लबच्या वतीने शहरात रक्तदान, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, वंचित घटकातील विद्यार्थ्यांना मदत आदी उपक्रम राबविण्यात येतात. मागील वर्षा पासून या क्लबच्या माध्यमातून कोरोना महामारीच्या संकटकाळात दुर्बल घटकांसाठी भरीव मदत देण्याचे कार्य सुरु असून, नुतन नुतन पदाधिकार्यांनी देखील आर्थिक दुर्बल घटकांना मदतीचा हात देण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.
नवनिर्वाचित अध्यक्षा गगन वधवा फंडू टॉईजच्या संचालिका असून, त्या शिक्षिका आहेत. सचिवपदी रिध्दी धुप्पड या देखील शिक्षिका आहेत. तर खजिनदार हरमीतकौर माखीजा अर्थ अॅण्ड क्युअर स्कीन केअरच्या संचालिका आहेत. सदर महिला पदाधिकारी अनेक वर्षापासून लायन्स क्लबला जोडले गेले असून, सामाजिक योगदान देत आहेत. या नुतन पदाधिकार्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
0 Comments