पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या गैरकारभाराची सखोल चौकशी करा

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या गैरकारभाराची सखोल चौकशी करा 

मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे बेमुदत उपोषण 

वेब टीम नगर : मौजे कर्जुले हर्या ता पारनेर येथील संपत भागाजी आंधळे यांच्या शेती गट नंबर ७६ मध्ये हॉटेल सुखसागर यांना दिलेल्या सर्व परवानग्या नियमबाह्य व बेकायदेशीर आहेत त्यामध्ये अकृषक नोंदणी करून लाखो रुपयांची आर्थिक तडजोड करून भ्रष्टाचार केलेला आहे व नगर जिल्ह्यातील मुळा नदीच्या पात्रातून दररोज १००ते १२५ ट्रक डंपर मधून वाळूची तस्करी होत आहे हे प्रत्येक वाळू माफियांकडून सदर महिन्याला १५ ते २० हजार रुपये हप्ता घेऊन त्यांच्या डोक्यावर हात ठेवून अंदाजे दोन कोटी रुपयाचा दर महा हप्ता गोळा करतात शासनाला महसूल दाखवण्यासाठी एखाद्या ट्रक चालकाचा डंपर पकडल्याचा दाखवून देखावा करतात तहसील ऑफीसच्या रजिस्टरला ट्रक डंपर पकडल्याच्या नोंदी आहेत.  परंतु त्यांच्याकडून दंड वसूल केल्याचे नमूद न करता ट्रक व डंपर सोडून दिले गेले आहे हे त्यांचे रजिस्टर मद्ये हप्ते गोळा करीत असल्याचे सिद्ध करीत आहे. 

 तसेच ढवळपुरी ता पारनेर येथील सैनिक बँकेचे कर्जदारांच्या १३७ एकर जप्त केलेल्या जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारात दलालामार्फत या जमिनीवरील पीक पाणी व खरेदी विक्री व्यवहारात बाया/आडफाटी असणाऱ्या सर्व नोंदी सर्कल मार्फत रद्द करून देऊन त्यांच्या दलालाकडून कोटीच्या आकड्यात रक्कम घेऊन भ्रष्टाचार केलेला आहे ज्योती देवरे तहसीलदार यांनी आपल्या सरकारी पदाचा अधिकाराचा तसेच शासकीय नियमाची पायमल्ली करून कोट्यवधी रुपयांची भ्रष्ट मार्गाने मिळवलेली संपत्ती आहे तरी त्यांनी जमा केलेल्या नामी बेनामी संपत्ती ची सखोल चौकशी त्यांच्या ज्ञात उत्पन्नानुसार वंशावळ संपत्ती नुसार आयकर विभागातील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथील भूजल संरक्षण कार्यालयाच्या आवारात बेमुदत उपोषण करताना अरुण रावबा आंधळे समवेत आरव आंधळे, बाळू मुळे, पप्पू काशीद, सचिन ठूबे, जाकीर शेख आदी उपस्थित होते.


 

Post a Comment

0 Comments