अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; संशयित गजाआड

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; संशयित गजाआड

वेब टीम नाशिक :  येवला  तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील ११ वर्षीय बालिकेवर एका ४६ वर्षीय संशयित नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची येवला घटना समोर आली आहे. रात्रीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत जीवे ठार मारण्याची धमकी तसेच पैशाचे आमिष दाखवून गावालगत असलेल्या पीडितेवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयित आरोपी नवाजी बंडू गोधडे यास अटक केली. त्याच्याविरोधात येवला तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्यास ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Post a Comment

0 Comments