अहमदनगर जिल्ह्याचे अंतरंग : पांडुरंग अवतार भाग - २

अहमदनगर जिल्ह्याचे अंतरंग : पांडुरंग अवतार भाग - २

पांडूला आलेल्या अनुभवावरून त्याचा विश्‍वास वाढला व लक्ष्मीच्या  सानिध्यात राहायचे त्यांनी ठरवले व अन्य ऋषींना बोलावून आश्रमाचे ठिकाण निश्चित केले.  श्री विष्णूंनी लक्ष्मीला जे सांगितले तेच लक्ष्मीने पांडूला सांगून लक्ष्मीदेवीच्या उत्तर बाजूस आश्रम स्थापन तपश्चर्या चालू केली.  त्यासाठी पांडूने रोजची दिनचर्या, कार्यक्रमाची मांडणी शास्त्रशुद्ध पद्धतीने तयार केली . त्याप्रमाणे या शौच मुखमार्जन ,चक्रतीर्थात स्नान, सूर्योपस्थानी  अर्ध्यप्रदान ,लक्ष्मीपूजन त्यानंतर मृगासनावर आसनस्थ होऊन गुरु वंदन, ध्यानस्थ होत कृष्णाचे चिंतन करणे नंतर फलाहार करणे पुढे स्वाध्याय पाठांतर अध्यात्म विचार, सायंकाळी पूजा साहित्य गोळा करणे, पूजा व आरती करणे, सायंफलाहार करणे, चिंतन मनन करीत निद्राधीन, याप्रमाणे दिनक्रम चालू केला.  येणे झाले चित्र कृष्ण रूप  रंगले !याचेच नाव अंतरंग वाहिले श्री कृष्ण !!(श्री मा  अ ६ओ १८)

दिवसामागून दिवस जात होते.  समाधी काल वाढत चालला होता.  तसतशी अंगी तेजस्विता चमकू लागली आत्मज्योती अंती प्रकाशली नवंनवं रूपे दिसू लागली आत्मदर्शन !!२१!!(श्री मा २१) एकदा तर वर्षभर समाधी अवस्था ढळली  नाही . सर्व ऋषींचे लक्ष पांडू कडे लागले, हे पाहून लक्ष्मीने श्री विष्णूंना प्रगट होण्याची प्रार्थना केली आणि बघता बघता उत्तरेकडून एक प्रकाश झोत आला. अन्यथा अंधकार झाला प्रत्यक्ष भगवंत प्रकटले परंतु  पांडू समाधि अवस्थेमधून  ढळले नाहीत.  शेवटी श्रीहरीने श्री लक्ष्मीला  सांगितले की पांडूला  सावध करा त्याप्रमाणे श्री लक्ष्मी सूक्ष्म रूपाने पांडूच्या मनात प्रविष्ट झाली व त्याची आत्मज्योती लोपवून  जागृत केले.  त्या वेळेला पांडू नेत्र उघडून पाहिले कोटी सूर्य प्रकाश मान तरीही चंद्रावरून शितल असे दीप्ती स्वरूप तेजोवलय अंकित अष्ट वर्षीय बालक देहाकार छोटे सिंहासनावर उभे असलेले दिसले. 

 श्री गोविंद गोपाल हरी प्रकटले होते . त्यांच्या त्या वलयात अनेक देवता दिसत होत्या उदाहरणार्थ ब्रह्मा-विष्णू-महेश श्री गणेशा आदिशक्ती लक्ष्मी आधी त्याच वेळेला श्रीपुर क्षेत्रातील देवता डाव्या-उजव्या बाजूला प्रगटल्या  गोपालकृष्णाच्या कटीस पितांबर , पायी  घागऱ्या, कमरी करगोटा ,श्री सुवर्ण मुकुट त्यावरी शिवस्वरूप शिवपिंड, काना मध्ये रुद्राक्ष कुंडले, कपाळी कस्तुरीचा केसरी मळवट, दंडात  सुवर्णपदके ,गळा वैजयंती माळा ,शोभायमान कौस्तुभमणी ,रत्नहार, यज्ञोपवीत ,ध्वज, अज्ञानींना  जागृत करून रक्षण करणारा सर्व देव, त्याला बाल गोपाल कृष्ण रूपास वंदन करीत आहे.  अश्या  परमात्म्याचे  दर्शन घडताना पांडू शर्माचे मन उल्हासित झाले . त्या वेळेला श्री लक्ष्मीने पांडू स ज्याचे दर्शन घेण्यास उत्सुक आहे ते स्वरूप तुझ्या समोर उभे आहे . त्यास  वंदन करून वरदान माग असे ऐकताच  पांडू पूर्ण ज्ञानी झाला व त्याने वर मागितला तो याप्रमाणे मला वर देण्यास तू प्रगटला या ठाण्यास तसेच नित्य  येथे राहावे! जनहित करीत!! माझे नाव सर्व मुखी राहील !ऐसे करी सर्व काळ!! माझ्यासाठी अवतरला असं लोक म्हणतील !ऐसे नाव करी असे मागता वरदान तथास्तु म्हणाले भगवान !!सर्व तेज आवरून  शीला रूप झाला !!( श्री मा ६८ ६९ ते ७१ )

 पांडूने सांगितले की मला वर द्यायचं असेल तर पांडू हे नाव धारण करण्याची विनवणी केली . त्याप्रमाणे गोविंद गोपाल यांनी पांडुरंग हे नाव धारण करून पांडू शर्मा या भक्ताची इच्छा पूर्ण केली.  तेव्हापासून गोविंद गोपाल यांना पांडुरंगा या नावाने भक्तगण ओळखू लागले. 

लेखक :  नारायण आव्हाड 

 संदर्भ शोधत पांडुरंगाचा 

लेखक डॉ.  अनिल सहस्त्रबुद्धे

या. नगर  संग्रहालय लायब्ररी

 ज्याठिकाणी पांडू शर्मा यांनी तप केले व त्या ठिकाणी पांडुरंगाचे बाल रूपामध्ये अवतरण झाले ते ठिकाण चोराचीवाडीच्या पूर्व बाजूला देव नदी व सरस्वती नदी संगम होतो त्या ठिकाणी हा प्रसंग घडला त्या ठिकाणी दोन नद्यांच्या संगमावर कोल्हापूर टाईप बंधारा बांधला आहे त्यामुळे संगमावर असलेले छोटे मंदिर पाण्यात गेले आहे . परंतु देव नदीच्या पूर्व बाजू च्या किनाऱ्यावर एक छोटेसे दोन बाय दोन फूट आकाराचे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जाणाई लक्ष्मी आणि पांडू शर्मा यांच्या मूर्ती आहेत. या ठिकाणी नारायण आव्हाड व गवळी सर गेले असता तेथील ग्रामस्थ रंगनाथ तात्या, बापू नाना, श्यामराव आणि मंडळी यांनी सांगितले की खूप जागृत देवस्थान आहे . आषाढ व श्रावण महिन्यात खूप मोठी यात्रा भरते.  त्या यावेळेला पंचक्रोशीतील समाज मोठ्या संख्येने लक्ष्मीच्या दर्शनासाठी येत असतो . 



Post a Comment

0 Comments