अहमदनगर जिल्ह्याचे अंतरंग : पांडुरंग अवतार

अहमदनगर जिल्ह्याचे अंतरंग : पांडुरंग अवतार

कृत्ये यदध्ययते,  विष्णू त्रेताया यजतो मुखै : !द्वापारें परिचर्या कलौ  तदधारीकीर्तनात!( श्रीमद् भागवत स्कंद १२ अ ३शो. ओ  क्र.५२) सत्संगात भगवंताच्या ध्यानाने त्रेतायुगात यज्ञांनी,द्वापारयुगात पूजा व कलयुगात फक्त भगवंताचे  नामस्मरणाने फळ प्राप्त होते असे. शुकांनी परीक्षिताला सांगितले  आहे.  दिव्य आणि विस्मयकारक भक्ती साधना नगरी म्हणून श्री पुरची ओळख स्व. एकनाथ सदाशिव जोशी यांनी या ग्रंथातून केली आहे.  कलियुगात भक्ती साधना ही सर्वश्रेष्ठ अध्यात्म साधना मानली जाते.  कलियुगामध्ये केवळ भक्तीने सर्व काही प्राप्त होते . भक्तीने श्रीकृष्ण समोर हजर होतो.( श्रीमद् भागवत महात्म्य श्लोक ४ व १९)

एकनाथ जोशी श्रीपुर महात्म्य या  क्षेत्र महात्म्य  ग्रंथात पांडे पांडुरंग अवताराची कथा स्कंद पुराणाचे प्रमाण देत सांगितली  आहे.  ही कथा बालाजी च्या अवतारा नंतर श्रीविष्णूने श्रीगोंदा येथील सरस्वती तिरी अवतरण झाले असे सूचित होते . पांडू शर्माच्या रंगात रंगले श्री गोपाल! कृष्ण झाले पांडुरंग !!त्यासंदर्भात जोशी म्हणतात श्रीपुर क्षेत्र अज्ञात !तेथे पांडुरंग अवतरला कोणासाठी!  ज्ञात कैसे व्हावे .!!१९ !!अ १ ला श्री म )जोशी कथा सांगतात गो लोकातील श्रीकृष्ण जो द्वापारातील द्वारकेचा राजा विष्णू वैकुंठात सिंहासनावर बसलेले असताना एका अभीवचनाची आठवण झाली आणि ते लक्ष्मीला म्हणाले कलयुगाचे  प्रारंभी पूर्वीचा एक तपस्वी योगी पांडुरंग नाव धारण करून गुरु आदेशानुसार माझी आराधना करील .  त्याच्या तपाचे सामर्थ्याने मला तेथे प्रकट व्हावे लागेल व त्या क्षेत्री राहावे लागेल आपण त्या क्षेत्री जाऊन त्या क्षेत्राचे महात्म्य वाढवावे.  हे सरस्वती तीर्थ म्हणून प्रसिद्ध आहे . या ठिकाणी १०८ स्थाने आहेत . त्या ठिकाणी सरस्वती नदी लहान आहे परंतु तिचे कार्य महान आहे.  म्हणून आपण त्याठिकाणी कीर्तन महात्म्य वाढवावे.  त्यावेळेला पांडू त्या क्षेत्री तप करण्यासाठी येईल व मला त्या क्षेत्री प्रगट व्हावे लागेल.  हे श्री विष्णूचे ऐकून श्री लक्ष्मी वैकुंठा वरून सरस्वती तीरावर जावयास निघाली .  त्यांनी एक ऋ षीच्या स्वप्नात येऊन सांगितले की, आपण येथे प्रकटलो  आहे.  दधिची, अगस्त्य, कपिल,विश्वामित्र, पाराशर, सारस्वत, गालव,मांडव्य ऋषी या परिसरात राहत होते.  श्रीगोंदा श्री लक्ष्मी, राधालक्ष्मी, चंडीकालक्ष्मी अशी  स्थाने आहेत.  त्या नुसारच या  क्षेत्राला श्रीपुर हे नाव पडले.  देवी प्रगट होताच दशदिशा तेजाने उजळून निघाल्या.  सरस्वती नदीमधून एक उबाळा उफाळून आला व नदी दुथडी भरून वाहू लागली.  सरस्वती नदी तिराचे श्रीपुर क्षेत्राची खूपच किर्ती वाढली.  यामुळे ऋषी तेथे तप करण्यासाठी आले.  विशेष वर लिहिलेले ऋषी त्यांच्या आश्रम व शिष्यामुळे ऋषींची गर्दी वाढली कारण श्री लक्ष्मीला श्रीविष्णु यांनी सांगितल्याप्रमाणे प्रसन्न वातावरण तयार केले.  या प्रकारे क्षेत्राला पावित्र्य प्राप्त झाले.  या श्रीपुर क्षेत्राचे नेमके स्थान सरस्वती ,भीमा संगमा  पासून चार कोसावर आहे . असे ऋषी मी उघड सांगितले आहे.  लक्ष्मी श्रीपती पुरात प्रगटल्या  वर गोकुळामध्ये श्रीकृष्णाचा जन्म झाला श्रीकृष्ण अवतार संपवून निजधामास गेले, तेव्हा द्वापार युग संपले.  श्रीपुर महात्म्याचा तिसऱ्या अध्यायात श्रीपुर प्रगटल्यावरी श्रीकृष्ण अवतार झाला गोकुळी !त्यापुढे द्वारकेभीतरी  राहणे घडले !!या वरून आपण म्हणतो विधिलिखित त्याप्रमाणे सारे घडत असते . श्रीपुरात  श्रीकृष्णाचे अवतरण होणे हे निश्चित होते, असे नारायण आव्हाड म्हणाले . 

दोन शतकाच्या नंतर एका विप्रकुलात पांडूचा जन्म झाला तो पूर्वजन्मीचा योगी  होता.  जन्मता ते निष्ठावंत होते.  त्याबरोबर कृष्णकथा ऐकणे त्यामुळे कृष्णचिंतन सुरू झाले.  भक्ती विना मोक्ष नाही तीर्थे व्रत केले पूजा अनुष्ठान पारायण वगैरे केले.  नंतर विवाह झाला गृहस्थ  धर्म पुरुषार्थ प्रमाणे साधण्याचा प्रयत्न केला.  तरी योगनिष्ठ असल्यामुळे संसारामध्ये समाधान लाभलं लाभेना.  सद्गुरु शिवाय ब्रह्मज्ञान नाही याची जाणीव झाली . ज्ञानाचा ध्यास उत्कट अवस्थेत पोहोचला सद्गुरूंनी स्वप्नात दृष्टांत दिला गावात मुनी  थेट समोर दिसले . ब्रह्ममुहूर्त पाहून पांडू सद्गुरूंच्या भेटीस आश्रमाकडे निघाले.  मुनींची कीर्ती  पांडू शर्मा यांनी ऐकली होती.  त्यांना प्रत्यक्ष पाहता ध्यानस्थ बसलेल्या ऋषींना पांडूने वंदन केले.  ऋषींनी नेत्र उघडतात त्यांच्याकडे पाहून आपला उद्धार करण्याची सद्गुरूंना साश्रूनयनांनी शरणागत होऊन विनंती केली व आपली सर्व हकीकत त्यांच्यापुढे सांगितली.  श्रीगुरुंनी त्यांच्या कानी तारक मंत्र दिला आणि सद्गुरू म्हणाले दक्षिणेकडे श्रीपुर नावाचे क्षेत्र आहे त्याचे तप करणारा अपवित्र असतानाही ब्रह्मज्ञान झाला असा अनुभव आहे.  तेथे जाऊन तप कर असे गुरू आज्ञा झाली अशी माहिती नारायण आव्हाड यांनी दिली. 

गिरीधर, व्दिभूजाआकृती, असे शामसुंदर, लावण्यपूर्ण पितांबर परिधान करुन, कौस्तुभमणी, वैजयंती माळा धारण केलेल्या गोपाळकृष्णाचे ध्यान करावे . ध्यानाचा अभ्यास करावा तीच समाधी मानवी श्री गुरूचा उपदेश ऐकून पांडू समाधी मग्न झाला.  आज्ञा घेऊन श्रीपुरी वैष्णवनगरी  मार्गस्थ होताना, सद्गुरु म्हणाले पांडव भगवंताचे दर्शन व ब्रह्मज्ञान हे जीवात्म्याची सोयरिक  आहे.  तेथे भक्तास संसार प्रपंचाचे भान असता कामा नये तरच अदभूत घडेल . पांडूने सद्गुरुचा उपदेश स्वीकार करुन निश्चयाचे अभिवचन दिले . नंतर सद्गुरुने श्रीपुर क्षेत्राचे निश्चित स्थळ सांगितले.  श्रीपुरे ज्योत्स्ना  ऐसी संतोषविल  मना! तोचि लक्ष्मीचा ठिकाणा श्री नाम त्या!! (श्री मा  ओळी ४-५)

 अखेर तो संगमतीर्था पर्यंत आला.  सद्गुरूंनी सांगितलेल्या खुणा  ओळखून पांडूने संगमाला वंदन केले.  सरस्वती प्रत्यक्ष अनुभवताना पांडूचा ऊर भरून आला . सर्व प्रकारे स्नानसंध्याविधी, तर्पण विधी पूर्ण करून पापनाशिनी सरस्वतीला कृतज्ञतेने वंदन केले . जलपान करताच  ज्ञानप्रकाश ते सर्व स्व तिची महती ऐकून पांडूने सरस्वतीला पुन्हा पुन्हावंदन  केले व मार्गक्रमण करीत उत्तरेकडे निघाला , वनातील क्षुधा  शांत करणाऱ्या  मधुर फळांचा आस्वाद घेत पांडू लक्ष्मी तीर्थावर आला.  लक्ष्मीला वंदन करून त्याने प्रार्थना केली.  हे लक्ष्मी भगवती तुमचा महिमा थोर जगती! तप करितो या स्थानी त्या प्रती तुम्ही ब्रह्मज्ञान देता!! (२६ श्री मा अ५ ओळ२६)

सद्गुरूंचा निरोप सांगून आपला उद्धार करण्याची विनंती केली.  पांडूची प्रार्थना ऐकताच  आवाज आला पांडू तुझ्या  तपा  करता संनिधस्थान आहे ! तिथे आश्रम उभारुनी करी तपाचरण सुखनैव कल्याण तुझे साधी (२९ श्री मा ५ पा. २८ व २९) (उर्वरित उद्याच्या भागात )

Post a Comment

0 Comments