तडीपार गुंडाचा दगडाने ठेचुन खून

तडीपार गुंडाचा दगडाने ठेचुन खून


वेब टीम राजगुरूनगर : राजगुरूनगर शहरात विविध प्रकारच्या गुन्ह्यांत सहभाग असलेला तडीपार गुंड राहुल उर्फ पप्पू कल्याण वाडेकर (वय २८) याचा दगडाने ठेचून व धारदार शस्त्राने खून करण्यात आला आहे. येथील एका हॉटेलमध्ये खंडणीसाठी मालकावर खुनी हल्ला करण्यात आला होता. या रागातून मालक व त्याच्या अन्य पाच साथीदारांनी पप्पूचा काटा काढल्याचा अंदाज पोलिस निरीक्षक सतीश गुरव यांनी वर्तवला आहे.

पप्पू वाडेकर याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी असे विविध प्रकारचे नऊ गुन्हे दाखल आहेत. टोळीचा म्होरक्या म्हणून त्याच्या विरोधात खेड पोलिसांनी शिफारस केल्यानुसार त्याला खेड, आंबेगाव व जुन्नर तालुक्यातून सहा महिने तडीपार करण्यात आले होते. रविवारी (दि. ११) रात्री तो आपल्या नातेवाइकांना भेटण्यास राजगुरुनगर येथे आला होता. रविवारी खेड- पाबळ मार्ग परिसरात त्याला संशयित आरोपींनी गाठले. रोडलगत एका झाडाखाली आरोपींनी वाडेकरचा दगडाने ठेचून खून केला. या घटनेने शहरात खळबळ उडाली. घटनास्थळी जिल्हा ग्रामीण अधीक्षक अभिनव देशमुख, खेड उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल लंबाते, खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश गुरव यांनी भेट दिली.

Post a Comment

0 Comments