मतिमंद मुलीवर अत्याचार नराधम अटकेत

मतिमंद मुलीवर अत्याचार नराधम अटकेत 

वेब टीम अमरावती : जिल्ह्यातील शोषणाच्या घटना सतत घडत असताना शहरातील एका मतिमंद मुलीला एका नराधमाने आपल्या वासनेचा शिकार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. परिचयातील युवकांनी घरातील लहान मुलीला बाहेर पाठव मतिमंद मुलीसोबत केलेल्या कृत्याने पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

सतीश हंसराज भाले (रा. एरंडगाव ता. नांदगाव खंडेश्वर) असे अटक केलेल्या नराधमाचे नाव आहे. पीडित तरुणी ही मतिमंद असून, लहान बहिणीसह शहरात राहते. पीडितेची लहान बहिणी ही परिचारिका आहे. गुरुवारी दुपारी पीडिता व लहान बहिणीची सहा ते सात वर्षीय मुलगी या दोघी घरात होत्या. त्याच वेळी सतीश भाले हा घरात आला व त्याने चिमुकलीला काही पैसे दिले आणि दुकानातून चिप्स आणण्यासाठी पाठवले.

चिमुकली चिप्स आणण्यासाठी घरातून बाहेर पडल्यानंतर सतीशने घराचा दरवाजा बंद केला. या वेळी घरात कोणीही नसल्याची संधी साधून मतिमंद तरुणीवर त्याने अत्याचार केला. त्यावेळी पीडितेची बहीण कामानिमित्त बाहेर गेली होती. गुरुवारी रात्री पीडितेची बहीण रुग्णालयातून घरी परत आली.

यावेळी पीडित तरुणीने घडलेला घटनाक्रम तिला सांगितला. या गंभीर प्रकरणी पीडितेच्या बहिणीने शुक्रवारी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी सतीश भालेविरुद्ध तातडीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी शोध घेऊन शुक्रवारी उशिरा रात्री त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. एका मतिमंद तरुणीवर अत्याचार करणाऱ्यांना या नराधमाविरुद्ध जनमानसात प्रचंड रोष व्यक्त केला जात आहेत.

Post a Comment

0 Comments