कलादिग्दर्शक स्व.राजू साप्ते यांना न्याय मिळावा

कलादिग्दर्शक स्व.राजू साप्ते यांना न्याय मिळावा

अ.भा. म. चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी दिले गृहमंत्री यांना निवेदन

वेब टीम मुंबई : गृहमंत्री  दिलीप वळसे पाटील यांनी  कै.राजू साप्ते यांनी केलेली आत्महत्या व त्यात युनियन व त्यांच्या लोकांनी केलेली दमदाटी या विषयातील गांभीर्य लक्षात घेऊन मंत्रालयात बैठक आयोजित केली होती. या बैठकीला गृहराज्य मंत्री शंभूराजे देसाई , गृहराज्य मंत्री सतेज पाटील , श्रीमती विद्याताई चव्हाण- सदस्या विधान परिषद,आदेश बांदेकर साहेब-अध्यक्ष सिद्धीविनायक ट्रस्ट, श्रीमती राजलक्ष्मी भोसले- माजी महापौर पुणे,  गृहखात्याचे अप्पर मुख्य सचिव, ग्रुहखात्याचे प्रधान सचिव, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, पोलीस आयुक्त बृहनमुंबई, पोलीस आयुक्त पुणे, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, आयुक्त कामगार, संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय, व्यवस्थापकीय संचालक गोरेगाव चित्रनगरी, व्यवस्थापकीय संचालक कोल्हापूर चित्रनगरी, बाबासाहेब पाटील-अध्यक्ष प्रदेश राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग, उल्हास नांद्रे- कलादिग्दर्शक संघ,संतोष फुटाणे- कलादिग्दर्शक,वासू पाटील- कलादिग्दर्शक ,रंगराव चौघुले-कलादिग्दर्शक ,दिघू तळेकर-कलादिग्दर्शक व  मेघराज राजेभोसले- अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांना आमंत्रित केले होते. यावेळी मेघराज राजेभोसले यांनी गृहमंत्र्यांना लेखी निवेदन दिले. त्यात त्यांनी पुढील मागण्या केल्या.

१-राजू साप्ते यांच्या मारेकर्यांना मोक्का लावावा.२-सिने व्यावसायिकांच्या वेगवेगळ्या कायद्याने स्थापन झालेल्या युनियनची नोंद त्यांच्या घटना, नियमवालीनुसार महाराष्ट्र शासनाकडे करणे बंधनकारक करावे.3- प्रत्येक युनियन, संघटना, महामंडळ यांच्या सभासदांचा डाटा दरवर्षी शासनाकडे अद्ययावत करावा.४- सर्व प्रकारच्या कलावंतांना शासनमान्य ओळख मिळावी किंवा ओळखपत्र देण्यात यावे५-उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सर्व युनियन ला महाराष्ट्रातील सर्व शूटिंग लोकेशनवर जावून तपासणी करण्यास प्रतिबंध करावा६-अशा प्रकारे शूटिंग लोकेशनवर जावून कोणी दादागिरी करीत असेल किंवा खंडणी मागत असेल तर त्यासंदर्भात केलेल्या तक्रारीची स्थानिक पोलिसांनी त्वरित दखल घेऊन निर्मात्यांना दिलासा द्यावा७- राज्य शासनाची शूटिंग परवानगी साठी एक खिडकी योजनेची अंमलबजावणी संपूर्ण महाराष्ट्रात करावी.८- रात्री अपरात्री शूटिंग करून घरी परतणाऱ्या कलावंत, तंत्रज्ञ वा कामगार यांना विनाकारण अडवू नये. योग्य तो पुरावा पाहून त्यांना त्वरित सोडले जावे.

या मिटिंग मध्येगृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेब यांनी सर्वांना आश्वस्त केले की, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. अशा लोकांचा व अशा प्रवृ त्तींचा ताबडतोब बंदोबस्त करण्याचे आदेशच त्यांनी संबंधितांना दिले.

ज्या पद्धतीने मंत्री महोदयांनी या प्रकरणात लक्ष घातले याविषयी सगळ्यांनी समाधान व्यक्त केले. व या प्रकरणी सरकार तळाशी जावून सोक्षमोक्ष लावणार याची खात्री पटली.अशी माहिती अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे खजिनदार श्री.संजय ठुबे आणि अहमदनगर जिल्हा मुख्य समन्वयक श्री.शशिकांत नजान यांनी दिली.


Post a Comment

0 Comments