राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने स्टेट बँक चौक येथे चक्काजाम

राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने स्टेट बँक चौक येथे चक्काजाम 

ओबीसी आरक्षण स्थगिती जोपर्यंत उठवली जात नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नये          

वेब टीम नगर : राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याच्या निषेधार्थ स्टेट बँक चौक येथे चक्काजाम आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालय येथे निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी जिल्हा अध्यक्ष नानासाहेब जुंधारे, माणिकराव दांगडे, सय्यदबाबा शेख, गंगाधर कोळेकर, मेजर हाके, सुवर्णाताई जहाड, गोरख वाडतके, डॉ सुनील चिंधे, संदीप कादळकर, शहाजी कोरडकर, मंदाकिनी बडेकर, रमाजी केमकर, माणिकराव शिंदे, भगवान करवर, अमोल शर्माळे, विनायक नजन, बाजीराव लेंडाळ, मीनाताई राहिंज, राजेंद्र महारले आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.                                          

महाराष्ट्रातील महागडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे व गलथान कारभारामुळे राज्यातील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहेत अर्थात या कामी राज्य सरकारने आवश्यक त्या न्यायालयीन बाबीची वेळेत पूर्तता केलेली नाही परिणामत सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण तीन अटीची पूर्तता करेपर्यंत ही स्थगिती केलेली आहे आघाडी सरकारच्या ओबीसी सह इतर सर्वच घटकांच्या आरक्षण विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी व खालील प्रमुख मागण्यांसाठी राष्ट्रीय समाज पक्ष चार जुलै रोजी राज्यभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जेलभरो आंदोलन व चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे राज्य सरकारने ओबीसी इतर मागासवर्गीय आयोगाची स्थापना करून न्यायालयीन बाबी च्या पूर्ततेसाठी काम सुरू करण्यात यावे व ओबीसी समाजाचा ईपरीकल अनुभवा लिखित डाटा माहिती तातडीने जमा करून न्यायालयात द्यावेत तसेच ओबीसी आरक्षण ही स्थगिती जोपर्यंत उठवली जात नाही तोपर्यंत ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नये या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्ष राज्यभर आंदोलन करण्यात आले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments