पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून केली हत्या

पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून केली हत्या 

वेब टीम देहरादून : उत्तराखंडची राजधानी देहरादूनमध्ये एक अत्यंत घृणास्पद घटना समोर आली. एका अवघ्या पाच वर्षांच्या चिमुरडीवर

लैंगिक अत्याचार करून गुन्हा लपवण्यासाठी तिला जीवे मारण्यात आलं. या प्रकरणी पोलिसांनी एका नराधमाला अटक केलीय. आरोपीनं लैंगिक अत्याचार आणि हत्येची कबुली दिलीय.

देहरादूनच्या प्रेमनगर भागात ही घटना घडलीय. गोविंदगड भागातून पाच वर्षांची मुलगी मंगळवारी आपल्या घरातून अचानक बेपत्ता झाली होती. बुधवारी रात्री उशिरा या चिमुरडीचा मृतदेह जवळच्याच झाडाझुडपांच्या परिसरातून ताब्यात घेण्यात आला. पीडित मुलीच्या कुटुंबानं सोमवाीर लक्ष्मण पोलीस चौकीत मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती.

मृत मुलीची आई घरकाम करते तर तिच्या वडिलांनी १५ दिवसांपूर्वीच मजुरीचं काम करताना चंदीगडकडे जाण्यासाठी घर सोडलं होतं. मंगळवारी नेहमीप्रमाणे खेळता - खेळता पाच वर्षांची चिमुरडी आईच्या नकळत घराबाहेर पडली होती. परंतु, शोधाशोध करूनही मुलगी सापडली नाही. या घटनेची तक्रार पोलिसांत नोंदवण्यात आली होती.

प्रकरणाची चौकशी करताना एका संशयिताला या भागात एकटं फिरताना पाहिल्याची माहिती काही स्थानिकांनी दिली. संशयाच्या आधारावर पोलिसांनी चुनमुन मेहतो नामक एका २५ वर्षीय तरुणाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. पोलिशी खाक्या दाखवताना चुनमुन मेहतो यानं आपला गुन्हा कबूल केला. आरोपीनं गुन्हा कबूल केल्यानंतर त्यानं दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळावरून मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला. घटनेचा पंचनामा दाखल करून पोलिसांनी मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलाय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चुनमुन मेहतो हा मूळचा बिहारचा रहिवासी आहे. देहरादूनमध्ये तो मजुरीचं काम करतो. बांधकामाच्या ठिकाणी टाईल्स लावण्याचं काम चुनमुन करतो.

पोलिसांनी आरोपी चुनमुनला ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयासमोर हजर केलं. न्यायालयानं त्याला तुरुंगात धाडलंय

Post a Comment

0 Comments