श्रीगोंद्यात पत्रकारांचा महावितरणच्या अधिकार्‍यांचा निषेध,कायदेशीर कारवाई करण्याची मागणी

श्रीगोंद्यात पत्रकारांचा महावितरणच्या अधिकार्‍यांचा  निषेध,कायदेशीर कारवाई करण्याची मागणी 

वेब टीम श्रीगोंदा :  वर्तमानपत्रात प्रसिद्ध केलेल्या बातमीचा राग अनावर होवून महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणत पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला असल्याबाबत श्रीगोंदा पत्रकास संघाच्या वतीने निषेध व्यक्त करत सबंधीत अधि कार्‍यांविरुद्ध कायदेशी कारवाई करावी अश्या मागणीचे निवेदन श्रीगोंदा तहसील प्रदीप पवार व श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.

   या बाबत अधिक माहिती अशी की,दैनिक श्रीगोंदा सिटीझन वृत्रपत्रात दि.२९ जुन पासुन महावितरण च्या गलथान कारभारचा रोखठोक पर्दाभाष करणाऱ्या  बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या .या बातम्यांचा राग अनावर होवून वीज वितरण कंपनीचे उप अभियंता अधिकारी अनिल गंगाराम चौगुले यांनी दैनिक सिटीझनच्या वृत्तांवर आक्षेप घेत वृत्तपत्राच्या संपादकावर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली.

           श्रीगोंदा तालुक्यातील विविध सामाजिक,राजकीय, सांस्कृतिक,शैक्षणिक,बातम्या प्रसारित करणे हे पत्रकारांचे कर्तव्य आहे आणि त्या नुसार पत्रकार बातम्या प्रकाशित करत असतात.अनेकदा राजकीय बातम्यांचा रोष धरून वृत्तपत्रांवर आरोप प्रत्यारोप होत असतात.तसेच वाळू तस्करी,गौण खनिज व अवैध व्यवसायाबाबत लिखाण करणे अपरिहार्य असते याद्वारे अनेकांच्या रोषाला बळी पडून मध्यम प्रतिनिधीना निशाणा केला जातो.अशाच प्रकारे वृत्तपत्र व पत्रकारांचे आवाज दाबण्याचे प्रकार सर्रास घडत असतात  त्यातलाच हा एक प्रकार आहे.

वीज वितरण कंपनीचे अधिकारी चौगुले यांनी वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीचा राग अनावर होवून त्यानी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन पत्रकारांचा आवाज दाबण्याचा केला आहे.या घटनेचा सर्व पत्रकार बांधव जाहीर निषेध करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

     या वेळी मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दत्ता पाचपुते,तालुकाध्यक्ष अंकुश शिंदे,बाळासाहेब काकडे,मिराताई शिंदे,चंदन घोडके,दादा सोनवने,योगेश चंदन,राजेंद्र राऊत,अर्शद शेख,जिल्हा ग्रामिण पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सोहेल शेख,अनिल तुपे,दत्ता जगताप,राजु शेख, पीटर रणसिंग,संतोष गोरखे,मुश्ताक पठाण उपस्थित होते.(फोटो-सिटीझन)

Post a Comment

0 Comments