आज जिल्ह्यात ४०४ कोरोना बाधित

आज जिल्ह्यात ४०४ कोरोना बाधित 

वेब टीम नगर : अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत चढ -उतार कायम असून  तशी प्रशासनाची धाकधूकही वाढते आहे. कालच्या पेक्षा  कोरोना बाधितांची संख्या काहीशी कमी झाली असून नव्याने नोंद झालेल्या कोरोनाबाधितांची संख्या ४०४ इतकी झाली आहे त्यामुळे जिल्ह्यातील वातावरण काहीसे दिलासादायक झाले आहे. शहरातील व्यवहार सुरळीत ठेवायचे असतील तर कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन नगर जिल्हावासियांना करावे लागणार आहे.

गेल्या चोवीस तासात नगर जिल्ह्यात ४०४ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून शहर व तालुका निहाय रुग्ण संख्या खालील प्रमाणे अहमदनगर शहर- ०८, राहता- २२,श्रीरामपूर-०९ , संगमनेर - ३६, नेवासे- ३१, नगर तालुका- २१ ,पाथर्डी - ५२ ,अकोले - २१, कोपरगाव - १०,कर्जत - ०७, पारनेर - ९०, राहुरी - १३, भिंगार शहर- ००,शेवगाव -३०, जामखेड - १५, श्रीगोंदे - ३२, इतर जिल्ह्यातील - ०७, मिलिटरी हॉस्पिटल -०० आणि इतर राज्यातील - ०० जणांचा समावेश आहे.

Post a Comment

0 Comments