'फ्लाईंग सिख ' मिल्खा सिंग कोरोनाने कालवश

'फ्लाईंग सिख ' मिल्खा सिंग कोरोनाने कालवश 

वेब टीम नवी दिल्ली :  भारताला आशियाई स्पर्धेत चार सुवर्ण पदक  जिंकून देणारे  माजी धावपटू मिल्खा सिंग  यांचे कोविड मुळे निधन झाला आहे.   पंजाबमधील चंडीगड येथील रुग्णालयात शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते.

१७ मे रोजी मिल्खा सिंग यांचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. तब्येत बिघडल्यानंतर त्यांना मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर त्यांची प्रकृती सुधारत होती, त्यानंतर ३१ मे रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. डिस्चार्जनंतर ते सेक्टर-८ येथील आपल्या घरात कोविड नियमांचं पालन करीत आराम करीत होते. मिल्खा सिंग यांच्या कूक ला सर्वप्रथम कोरोनाचा संसर्ग झाला होता आणि त्यानंतर त्यांना आणि पत्नी निर्मल मिल्खा सिंग यांना कोरोनाचा संसर्ग झाला.

मिल्खा सिंग यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मिल्खा सिंग यांच्या निधानाने आपण एक महान खेळाडू गमावला आहे ज्यांनी देशातील नागरिकांच्या मनात आपलं एक विशेष स्थान निर्माण केले होते. त्यांचे प्रेरणादायक व्यक्तिमत्व लाखो लोकांपर्यंत पोहोचले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करताना मिल्खा सिंग यांच्यासोबतचा एक जुना फोटोही ट्विट केला आहे. पंतप्रधानांनी ट्विट करत पुढे म्हटलं, मी काही दिवसांपूर्वी मिल्खा सिंग यांच्यासोबत बोललो होतो. ते आमचे शेवटचे संभाषण ठरेल हे माहिती नव्हते. अनेक नवोदित अॅथलेटिक्स हे मिल्खा सिंग यांच्या आयुष्यातील प्रवासातून प्रेरणा मिळवतात.

Post a Comment

0 Comments