वसतिगृहाच्या जागेत अतिक्रमण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा

वसतिगृहाच्या जागेत अतिक्रमण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा

 बहूजन शिक्षण संघाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन                                 

वेब टीम  नगर : राहुरी खुर्द येथे बहुजन शिक्षण संघाचे संघमित्रा विद्यार्थी वसतिगृह असून या जागेवर अतिक्रमण करून पत्र्याच्या शेडचे काम करणाऱ्या काळू सूर्यभान गायकवाड यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा असे निवेदन बहुजन शिक्षण संघाने जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना दिले आहे.                        

याबाबतची सविस्तर माहिती अशी की राहुरी खुर्द येथील संघमित्रा विद्यार्थी वसतिगृह हे मागासवर्गीय, आदिवासी, भटके,अनाथ मुलांचे वसतिगृह असून वसतिगृहाचे सर्वे नंबर ९१/३ क्षेत्र ४० आर या जागेत काळू गायकवाड याने संस्थेच्या मालकीची जागा गिळंकृत करण्याच्या उद्देशाने पत्र्याच्या शेडचे काम चालू केले याबाबत वसतिगृहाचे अधीक्षक मधुकर विधाते यांनी बांधकामास हरकत घेऊन,विचारणा केली असता, गायकवाड याने दडपशाही करत मारण्याची धमकी देत गावातील अनोळखी लोकांना हाताशी धरून वसतिगृहाच्या जागेत नव्याने बांधकाम केले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.यावेळी बहूजन शिक्षण संघाचे कार्यकारी रजिस्ट्रार प्रा.व्ही.एम.बैचे,आरपीआय चे जेष्ठ नेते माजी नगरसेवक अजय साळवे,वसतिगृहाचे अधीक्षक मधुकर विधाते, नितीन कसबेकर आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments