शहाजी महाराज यांची सुपे जहागिरीची व्यवस्था

शहाजी महाराज यांची सुपे जहागिरीची व्यवस्था

आदिलशहा व मोगल यांच्या मध्ये खूप मोठा तह  झाला होता.  त्या तहाने दक्षिणेत खूप काळ चाललेला संघर्ष काही काळापुरता थांबला आणि राज्यात शांतता नांदू लागली शहाजी राजांच्या मागणीनुसार विजापूर दरबारने शहाजी महाराजांना पुणे व सुपे प्रांताची जहागिरी दिली परंतु तिची देखभाल करण्यास शहाजीराजांना वेळच मिळाला नाही कारण नाही उपाशी राहू द्यायचे नाही आणि पोटभर जेवण द्यायचे नाही या म्हणीप्रमाणे राजांना शहाजीराजे यांची नेमणूक कर्नाटक मोहिमेवर केली. 

यामुळे शहाजीराजांना दोन्ही ही जहागिरीवर विश्वासाची माणसे नेमावी लागली.  त्याप्रमाणे दादोजी कोंडदेव हा पुणे प्रांतातील पाटस परगण्याचे कुलकर्णी होते.  ते वृद्ध अनुभवी कर्तबगार होते.  चारित्र्यवान माणसाची नेमणूक  करण्यासाठी केली  आणि सुपे  जहागिरीसाठी शहाजी महाराजांनी आपल्या दुसर्‍या बायकोचा भाऊ संभाजी याची नेमणूक केली . शहाजीराजांची तुकाई ही  मोहिते घराण्यातली दुसरी बायको होती.  शिवाजी महाराजांचा सावत्र मामा  शिवाजी महाराजांना अजिबात मानीत  नव्हता.   त्याच्या कारभाराविषयी शहाजीराजांना खूप तक्रारी गेल्या होत्या.  जहागिरीचा कारभार  सुधारण्यासाठी शहाजी महाराजांनी संभाजी मोहिते यांना पत्रे पाठविली होती परंतु त्याचा तसा फार काही उपयोग झाला नाही संभाजी मोहिते यांच्या विषयीच्या तक्रारी शहाजीराजांना येतच होत्या. 

शिवाजीच्या प्रदेशरक्षणासाठी त्याला हा प्रदेश आपल्या ताब्यात घेणे खूप महत्त्वाचे वाटले संभाजी या जहागिरीवर राहणे त्यांना खूप धोक्याचे वाटू लागले.  त्या वेळी शिवाजी महाराज यांनी वडीलकीपणाचा विचार न करता सुपे परगण्यावर स्वारी केली.  त्या प्रदेशातील लोकांची संभाजी मोहितेच्या जाचातून मुक्तता करणे हाही हेतू शिवाजी महाराजांच्या डोक्यात होता.  दुसरे म्हणजे जहागिरी वडिलांची होती वरील प्रमाणे विचार डोक्यात ठेवून शिवाजी महाराज ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी १६५६ साली कोणत्यातरी आमिषाने संभाजी मोहिते याच भेटावयास गेले आणि संभाजी मोहिते यांस  अटक केली व तेथील सर्व वस्तू आपल्या ताब्यात घेतल्या.  संभाजी शिवाजी महाराजांच्या कला  प्रमाणे वागले असते तर त्यांच्या स्वराज्यात फायदा झाला.  असता शिवाजी महाराजांनी मामाकडे दिवाळी पोस्त  मागण्यांचे निमित्ताने केले सभासद याविषयी म्हणतो की शंभरघोडे,  भरपूर द्रव्य व इतर वस्तू त्यांनी आपल्या ताब्यात घेतल्या . 

संभाजी मोहिते यांना शिवाजी महाराजांबरोबर राहण्यास कमीपणा वाटत होता.  त्यामुळे शिवाजी महाराजांनी मामांना मोठ्या बंदोबस्तात कर्नाटकला शहाजी राजांकडे पाठवून दिले व सुपा प्रदेश आपल्या जहागिरीची जोडून घेतला शिवाजीच्या राज्य स्थापनेच्या कार्यात सर्वात  मोठा राजकीय अडथळा झाला त्यांना वाटत होते की शिवाजी आपलेच आहेत  त्याला वरचढपणा का मान्य करायचा या उद्देशाने हे सर्व विरोध करत होते.  म्हणून शिवाजी महाराजांनी  बांदल, मोरे व  सुप्याचे मोहिते या सर्वांना युद्धात पराभूत करून आपले कार्य साधावे लागले व आपला अंमल बसवावा लागला. 

लेखक : नारायण आव्हाड 

इतिहास अभ्यासक व मोडी लिपी वाचक

 मोबाईल ९२७३८५८४५७

संदर्भ : महाराष्ट्र मराठ्यांचा इतिहास

 ऐतिहासिक वस्तू संग्रहालय अहमदनगर

 आवृत्ती २०२० 

Post a Comment

0 Comments