पंतप्रधान मोदींच्या हत्येची धमकी देणाऱ्याला दिल्ली पोलिसांकडून अटक

पंतप्रधान मोदींच्या हत्येची धमकी देणाऱ्याला दिल्ली पोलिसांकडून अटक

वेब टीम नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येची धमकी दिल्याने दिल्लीमध्ये एका २२ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा तरुण जामीनावर सुटला होता. मात्र पुन्हा जेलमध्ये जाण्यासाठी त्याने फोन करुन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येची धमकी दिली.

समलान असं या आरोपीचं नाव असून त्याने पोलिसांना फोन करुन हत्येची धमकी दिली होती. आरोपीने पोलिसांना फोन करुन ‘मला मोदींची हत्या करायची आहे’ असं म्हटलं होतं. यानंतर पोलिसांना खजुरी खास परिसरातून त्याला अटक करुन चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणलं. यावेळी त्याने आपल्याला पुन्हा जेलमध्ये जायचं असल्याने धमकी दिल्याचं पोलिसांना सांगितलं.

पोलिसांनी चौकशी केली असताना सलमानविरोधात पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असल्याचं समोर आलं. आरोपीने आपण जेलमध्ये जाण्यासाठी धमकी दिल्याची कबुली दिली असली तरी पंतप्रधानांच्या सुरक्षेशी संबंधित मुद्दा असल्याने गुप्तचर यंत्रणेचे अधिकारीही त्याची चौकशी करणार आहेत.

Post a Comment

0 Comments