करोना संक्रमित आसाराम बापूची प्रकृती खालावली, आयसीयूत दाखल

करोना संक्रमित आसाराम बापूची प्रकृती खालावली, आयसीयूत दाखल

वेब टीम जयपूर : बलात्कार प्रकरणातील दोषी आसाराम  याला रुग्णालयात हलवण्यात आलंय. तुरुंगात बंद असलेला ८० वर्षीय

आसाराम  करोना चाचणीत करोना संक्रमित आढळला होता. त्याच्यावर तुरुंगातच उपचार सुरू होते. परंतु, जोधपूरच्या तुरुंगातच प्रकृती खालावल्यानंतर त्याला महात्मा गांधी रुग्णालय आणि कोविड सेंटरच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

बुधवारी सायंकाळी आसाराम कोविड पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं होतं. आसाराम बापूला अस्वस्थपणा जाणवत होता. त्यानंतर अचानक त्याची प्रकृती आणखीनच बिघडल्यानं तुरुंग प्रशासनानं आसारामला रुग्णालयात हलवलं. ऑक्सिजन पातळी कमी झाल्यानं आसारामवर रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू करण्यात आले.

जोधपूरच्या मध्यवर्ती तुरुंगातील एकूण १२ कैदी गेल्या महिनाभरात करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर आणखी काही कैद्यांमध्ये करोना संक्रमणाची लक्षणं दिसून येत आहेत. त्यांना तुरुंगाच्या डिस्पेन्सरीमध्ये आयसोलेट करण्यात आलं आहे.

समाजात 'आसाराम बापू' म्हणून ओळख तयार करणाऱ्या आसाराम बलात्कार प्रकरणात दोषी ठरलाय. जोधपूरच्या मध्यवर्ती तुरुंगात तो शिक्षा भोगत आहे.

दरम्यान, राजस्थानात बुधवारी १६,८१५ करोना संक्रमित रुग्ण आढळले. तर १५५ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात सध्या १ लाख ९६ हजार ६८३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात एव्हाना करोनामुळे ५०२१ जणांनी आपले प्राण गमावे आहेत.

Post a Comment

0 Comments