अमरावतीत प्रेमी युगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

अमरावतीत प्रेमी युगुलांची गळफास घेऊन आत्महत्या 

वेब टीम अमरावती : महादेवखोरी मागे असलेल्या सागवान जंगलात प्रेमीयुगलाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

महादेवखोरी परिसरातील मागील भागात असलेल्या सागवान जंगलामध्ये एक युवक दुपारच्या सुमारास बकऱ्या चारत असताना त्याला एका झाडाला युवक व युवती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. त्याने तत्काळ महादेवखोरी परिसर गाठून तेथील नागरिकांना ही माहिती दिली. नागरिकांनी फ्रेजरपुरा पोलिसांना या घटनेची माहिती दिली. ठाणेदार पुंडलीक मेश्राम पथकासह घटनास्थळी पोहचले. यावेळी पोलिस उपायुक्त शशिकांत सातव हे देखील घटनास्थळी पोहचले. घटनास्थळ जंगलाच्या आतील भागात असल्याने व रात्र झाल्याने अंधारातून दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली.

दरम्यान, यातील मृतक युवक हा महादेवखोरी परिसरातील तर युवती ही राजापेठ हद्दीतील असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करीत असून आत्महत्येच्या कारणाचा शोध घेत आहे. दोन्ही मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवागारात ठेवण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments