महिलेवर बलात्कार : व्हायरल व्हडिओ मुळे आरोपी अटकेत

महिलेवर बलात्कार : व्हायरल व्हडिओ मुळे आरोपी अटकेत 

वेब टीम बंगळूर : एका महिलेवर विनयभंग आणि सामूहिक बलात्कार प्रकरणी बंगळुरूत पाच बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आलीय. यात एका महिलेचाही समावेश आहे. या घटनेचा एक

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित घटना उघडकीस आली होती. महिलेच्या विनयभंग आणि बलात्काराचा हा व्हिडिओ आरोपींनीच बनवल्याचं समोर आलंय.

व्हायरल झालेल्या व्हिडिओत आरोपींचे चेहरेही समोर आले होते. याच व्हिडिओ क्लिपच्या आधारे एका महिलेसहीत पाच आरोपींना शोधून काढण्यात यश आलं. बंगळुरू शहर पोलिसांनी आरोपींना अटक केलीय. आर्थिक वादानंतर महिलेवर अत्याचार करण्यात आल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलंय.

यानंतर सागर (२३ वर्ष), मोहम्मद बाबू साहिक (३० वर्ष), रिडॉय बाबो (२५ वर्ष), हकील (२३ वर्ष) आणि एका महिलेला अटक करण्यात आलीय. हे सर्व जण अवैध पद्धतीनं बंगळुरू आणि हैदराबादमध्ये राहत असल्याचं पोलीस तपासात आलंय.

२२ वर्षीय पीडित महिला सध्या दुसऱ्या राज्यात असून तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं पोलिसांनी म्हटलंय. महिलेला विश्वासात घेऊन मॅजिस्ट्रेटसमोर तिचा जबाब नोंदविला जाईल. ही महिला पूर्वोत्तर राज्याची रहिवासी असल्याचं समजतंय. याबाबत आसाम पोलिसांचीही मदत घेतली जातेय. ही घटना गेल्या आठवड्यात घडल्याचं सांगण्यात येतंय.

व्हिडिओ क्लिप, आरोपींची उलट तपासणी दरम्यान आलेल्या तथ्यांच्या आधारे आरोपींवर बलात्कार, हल्ला करणे यांसारख्या आरोपांसोबत इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.


Post a Comment

0 Comments