सराईत गुन्हेगार विजय पठारे पुण्यातून जेरबंद

 सराईत गुन्हेगार विजय पठारे पुण्यातून जेरबंद 

वेब टीम नगर : शहरात दहशत निर्माण करून एकावर चाकू हल्ला करणारा सराईत गुन्हेगार विजय राजू पठारे व त्याचा साथीदार करण पाचारणे यांना तोफखाना पोलिसांनी पुण्यातून अटक केली. दरम्यान पठारे यांच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्यामुळे त्याच्यावर आता पुढील कारवाई करण्याचा प्रस्ताव केला जाणार आहे. गेल्या आठवडाभरात सातत्याने अनेक ठिकाणे बदलत असल्याने तो सापडत नव्हता. मात्र तोफखाना पोलिसांनी त्याला पुण्यातून शोधून काढून आज अटक केली आहे.

१९ मे रोजी दिनेश पंडीत (रा. सिद्धार्थनगर) व यापूर्वी बालिकाश्रम रोडवरील दोन दुकानात दरोडा टाकून दहशत निर्माण केली होती. विजय पठारे त्याचा साथीदार संतोष नवगिरे, गणेश पठारे तसेच विजय पठारेचा एक अनोळखी मित्र अशा चौघाजणांनी सिद्धार्थ नगर जवळील सुडके मळा परिसरात एकजणाला गंभीर मारहाण करून जखमी केले होते. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात पठारे व त्याच्या टोळीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Post a Comment

0 Comments