मनसे नेत्याच्या एका फोन मुळे 'त्या मृतदेहावर' झाले अंत्यसंस्कार
वेब टीम नगर : अहमदनगर शहरातील खाजगी हॉस्पिटल मध्ये गरीब कुटुंबातील व्यक्ती हा कोरोना आजारामुळे मृत्यूमुखी पडला खाजगी हॉस्पिटल चे बील दोन लाख ऐंशी हजार रूपये इतके झाले होते. त्या मृत्युमुखी पडलेल्या रूग्णांच्या नातेवाईकांकडे पैसेच उरलेले नव्हते .उरलेले पैसे भरले नाही म्हणुन अहमदनगर शहरातील तारकपुर रोडवरील बस स्टँड समोर असलेले हॉस्पिटलने रुग्णाची बॉडी अंत्यविधी साठीदेण्यास नकार दिला . सदर मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी मनसेचे नितीन भूतारे यांना फोन करून सर्व परिस्थिती सांगितली नितीन भूतारे यांनी सर्व परिस्थिती ऐकल्यानंतर ताबडतोप सदर हॉस्पिटल मधील डॉक्टर व हॉस्पिटल मालकांना फोन केला . ती बॉडी ताबडतोप अंत्यविधी करिता अमरधाम मध्ये द्या असे सांगितल्या नंतर बील भरले नाही म्हणुन २० तास अंत्यविधी साठी अडवून ठेवलेली बॉडी नितीन भूतारे यांच्या एका फोनवर ५ मिनिटातच अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्याकरीता सदर हॉस्पिटल पाठवुन दिली व राहिलेले३८०००रुपयांचे बील माफ केले त्यामुळें अंत्यविधी साठी दिवसभर बसलेल्या नातेवाईकांनी मनसेचे नितीन भूतारे यांचे आभार मानले परंतू नितीन भूतारे म्हणाले आज कोरोना काळात रूग्णांची सेवा करणे हे माझे पहिले कर्तव्य आहे.एवढे बोलून त्यांनी त्या मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीला श्रध्दांजली वाहिली.
नेता असावा तो असा आज पर्यंत हजारो रूग्णांना सेवा दिली पण कधी राजकारण केले नाही अभिमान आहे आम्हाला आमच्या नितीन भूतारे यांच्या वर मनसे शुभेच्छानचा वर्षाव होत आहे.
0 Comments