नगरमध्ये कोरोना बाधितांचा आजपर्यंतचा उच्चांक
वेब टीम नगर : जिल्ह्यात आज पुन्हा एकदा कोरोना बाधितांच्या संख्येने विक्रमी उच्चांक गाठला असून कालच्या रुग्णसंख्ये पेक्षा आजची रुग्ण संख्या ही जास्त असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.त्यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत असून प्रशासनाने लावलेले निर्बंध पुरेसे नसल्याचेच दिसून येत आहे.
शहरातील ऑक्सिजन पुरवठ्याची परिस्थिती सुधारली असली तरी ऑक्सिजनचा तुटवडा अजूनही सुरूच आहे.मात्र रुग्णांची वाढती संख्या पाहता कोणत्याही रुग्णालयात बेड शिल्लक नसल्याची परिस्थिती असून अजूनही ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेशन बेड साठी रुग्णांच्या नातेवाईकांची धावाधाव सुरुच आहे.
गेल्या चोवीस तासात नगर जिल्ह्यात ४४७५ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून शहर व तालुका निहाय वाढलेले रुग्ण संख्या खालील प्रमाणे अहमदनगर शहर- ७६६, राहता -२८१,श्रीरामपूर -२८३, संगमनेर- ३८६, नेवासे- १५६, नगर तालुका-४६८,पाथर्डी -१४४, अकोले -२०४, कोपरगाव -२३८,कर्जत -२४४, पारनेर -२८६, राहुरी -२१९, भिंगार शहर-९२ ,शेवगाव -१५२, जामखेड -१३०, श्रीगोंदे -३००, इतर जिल्ह्यातील -१०६, मिलिटरी हॉस्पिटल -०९ आणि इतर राज्यातील -११ जणांचा समावेश आहे.
0 Comments