कर्नाटकात ऑक्सिजनअभावी २४ रुग्णांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

कर्नाटकात ऑक्सिजनअभावी २४ रुग्णांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

 चामराजनगर जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक घटना

वेब टीम चामराजनगर : कर्नाटकात चामराजनगर जिल्हा रुग्णालयात सोमवारी एक मोठा अनर्थ घडलाय. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे तसंच इतर कारणांमुळे गेल्या २४ तासांत एकूण २४ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. प्राण गमावणाऱ्या रुग्णांत कोविडबाधित तसंच इतर रुग्णांचाही समावेशी आहे. ज्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे ते सगळे रुग्ण व्हेन्टिलेटरवर होते, असं समजतंय.

विशेष  म्हणजे, ऑक्सिजनअभावी रुग्णांना प्राण गमावावे लागल्याची कर्नाटकातील ही दुसरी घटना आहे. शनिवारीदेखील राज्यात ऑक्सिजनअभावी १२ रुग्णांचा मृत्यू झाला होता.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनीही चामराजनगरच्या या धक्कादायक घटनेची नोंद घेतलीय. त्यांनी या घटनेसंबंधी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मुख्यमंत्र्यांनी उद्या (मंगळवारी) एक आपात्कालीन बैठक बोलावलीय.

जिल्हाप्रभारी मंत्री सुरेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे मृत्यू का झाले? हे जाणून घेण्यासाठी अहवालाची प्रतिक्षा करत आहोत. अहवालानंतरच मृत्यूसंबंधी योग्य माहिती मिळू शकेल.

कर्नाटकात रविवारी ३७,७३३ करोनाबाधित रुग्ण आढळले त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १६ लाखांच्या पुढे गेलीय. तर रविवारी २१७ रुग्णांच्या मृत्यूनंतर राज्यात प्राण गमावणाऱ्या रुग्णांची संख्या १६,०११ वर पोहचलीय. राज्यात सध्या एकूण ४ लाख २१ हजार ४३६ संक्रमित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर एव्हाना ११ लाख ६४ हजार ३९८ रुग्णांनी करोनावर मात केलीय.

Post a Comment

0 Comments