मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार

मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार 

वेब टीम रांची :  आपल्या मित्रासोबत फिरायला गेलेल्या२५ वर्षीय तरुणीवर पाच जणांनी  रस्ता अडवून  सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना जमशेदपूरमध्ये  उघडकीस आली आहे.

या घटना बद्दल मिळालेली माहिती अशी कि पीडित युवती आपल्या मित्रासोबत घरी जाण्यासाठी निघाली होती. इतक्यात पाच आरोपींनी रस्त्यात दोघांची वाट अडवली. त्यानंतर मित्राला मारहाण करुन त्यांनी पळवून लावलं. तरुणीला एका तलावाजवळ नेऊन पाचही जणांनी आळीपाळीने बलात्कार केला. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास तरुणीने कशीबशी आरोपींच्या तावडीतून आपली सुटका करुन घेतली. त्यानंतर पोलिस स्टेशन गाठून तिने आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला . पोलिसांनी तातडीने पावलं उचलत  पाचही आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी धनराज महतो उर्फ राज (२२वर्ष), हरि महतो (३० वर्ष), रंजीत महतो (२७ वर्ष), कालू महतो (२४वर्ष) बुलेट महतो (२८ वर्ष) या पाच जणांना अटक केली आहे. न्यायालयाने या पाचही आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे.

झारखंड जिल्ह्यात अवघ्या तीन चार दिवसांपूर्वीच वासनांधता आणि क्रूरतेचा अक्षरशः कळस पाहायला मिळाला होता. ३५ वर्षीय महिलेवर तब्बल ११ जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. गँगरेप करणारे आठ आरोपी कोरोनाग्रस्त असल्याचं समोर आलं आहे. तर बलात्कार पीडितेलाही कोरोना संसर्ग झाल्याची माहिती आहे.


Post a Comment

0 Comments