सख्खा बापचं निघाला वैरी ट्रक खाली चिरडून केली दोन मुलींची हत्या

 सख्खा बापचं निघाला वैरी  
ट्रक खाली चिरडून केली दोन मुलींची हत्या 

वेब टीम मावळ : कोरोनाच्या प्रादुर्भावाने राज्यभर धुमाकूळ घातला असताना पुणे जिल्हयात काळजाचा थरकाप उडविणारा प्रकार घडला. एका माथेफिरू बापानंच आपल्या दोन मुलींची ट्रकखाली चिरडून हत्या करुन स्वतः आत्महत्या केल्याच्या घटनेने पुणे जिल्हयात खळबळ उडाली आहे. पुण्याच्या मावळ तालुक्यातील इंदोरी गावात ही मन सुन्न करणारी घटना घडली आहे.

मोठ्या मुलीचे प्रेमसंबंध सुरु असल्याचा संशय बापाला होता. त्यामुळे पोटच्या दोन मुलींच्या अंगावर ट्रक घालून बापाने बापाने त्यांची हत्या केली आणि त्यानंतर त्याच ट्रकखाली स्वतः आत्महत्या केली. पुण्याच्या मावळमध्ये मध्यरात्री एक वाजता हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भरत ज्ञानदेव भराटे याची एक मुलगी कोणत्यातरी एका मुलाला व्हॉट्सअ‌ॅपवर चॅटिंग करायची. हा प्रकार समजल्यानंतर भरत भराटे याला राग अनावर झाला. भराटे याने थेट नंदिनी भराटे आणि वैष्णवी भराटे या दोन्ही पोटच्या मुलींना ट्रकखाली झोपवले. तसेच त्यांच्या अंगावरुन ट्रक घातला. या घटनेत या दोन्ही मुलींचा मृत्यू झाला आहे. तसेच मुलींच्या अंगावर ट्रक घालून भरत फराटे यानेसुद्धा चालत्या ट्रकखाली उडी घेत स्वत:ला संपवलं आहे.या घटनेने मावळ तालुका हादरला आहे.

दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर इंदोरी गावासह संपूर्ण मावळ तालुका हादरला आहे. ही घटना वाऱ्यासारखी संपूर्ण राज्यात पसरली. आपली मुलगी एका मुलाला फक्त व्हॉट्सअ‌ॅपवर बोलते याचा राग मनात धरून आपल्या मुलीला संपवल्यामुळे या निर्दयी बापाविरोधात संताप व्यक्त केला जातोय. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. 

Post a Comment

0 Comments