नाशिक,विरारच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नगरमध्ये 'मॉकड्रिल'

 नाशिक,विरारच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नगरमध्ये 'मॉकड्रिल' 
वेब टीम नगर : नाशिक ,विरारच्या अग्नीकांडांच्या पार्श्वभूमीवर  जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे प्रशासन, पोलीस यंत्रणा व महानगरपालिका यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने 'मॉकड्रिल' केले. यावेळी अचानकपणे  शासकीय रुग्णालयात गॅसच्या टाकीतून गळती सुरू झाल्याचा संदेश देण्यात आला . त्यानंतर पोलीस ,मनपा प्रशासन ,अग्नीशमन दल व अन्य शासकीय यंत्रणा किती वेळात पोहोचले त्यानंतर त्यांनी किती शीघ्रतेने उपाययोजना केल्या यासर्व बाबींच्या नोंदी ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले.   अचानक घडणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी भविष्यात कराव्या लागणाऱ्या उपाययोजना करण्यासाठी सर्व विभागांना तातडीने आदेश देण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे, मुख्य अग्निशामक दल अधिकारी शंकर मिसाळ, उपजिल्हाधिकारी डॉ.अजित थोरबोले व इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments