राज्य सरकारचा निर्णय पक्का? फक्त घोषणा बाकी

 राज्य सरकारचा निर्णय पक्का? फक्त घोषणा बाकी

 १५ ते ३० एप्रिल दरम्यान लॉकडाऊन लागणार 

वेब टीम मुंबई : राज्यात वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे शासन स्तरावर लॉकडाऊन लावण्याचा निर्णय झाला आहे. तत्वतः १५ दिवस लॉकडाऊन करण्याचा सरकारचा विचार असून १५ ते ३० एप्रिल लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. सध्या लॉकडाऊन बाबत कागदपत्रांची तयारी सुरू आहे. त्यानंतर मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येतील. 

या काळात हातावर पोट असणाऱ्या लोकांना मोफत अन्नधान्य देण्याचा विचार असून शिवभोजन थाळी माध्यमातून मदत मिळणार आहे. तसेच या वर्गाला थोडी आर्थिक मदत देण्याचाही सरकारचा विचार आहे. अर्थ विभागाने बैठक घेऊन प्रस्ताव तयार केल्याची माहिती आहे. सार्वजनिक वाहतूक लॉकडाऊनमध्ये बंद नसली तरी सरसकट लोकं सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरु शकणार नाहीत. लोकांना प्रवास करताना त्यांची योग्य कारणे द्यावी लागणार आहेत. परवानगी शिवाय सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून लोकं प्रवास करू शकणार नाहीत. त्यावर निर्बंध येणार आहेत.

राज्यात लॉकडाऊन आधी जनतेला पूर्व सूचना देणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. जालन्यात ते पत्रकार परिषदेत बोलत होते. अर्थमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यात बैठक झाली. त्यावेळी लॉकडाऊनमधील येणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यात आली. दरम्यान लॉकडाऊनची जनतेनं मानसिकता ठेवावी आणि लॉकडाऊन लावण्याआधी जनतेला पुरेसा वेळ आणि पूर्वसूचना देण्यात येईल अशी माहिती टोपे यांनी दिली आहे. 


Post a Comment

0 Comments