नगर शहरात शुकशुकाट

 नगर शहरात शुकशुकाट 

दिल्लीदरवाजा 


दिल्लीगेट परिसर 

वेब टीम नगर : विकेंड लॉकडाऊन असल्याने नगरकरांची आजची सकाळ आळसावलेली होती. नगर शहरात सकाळी उशिरा पर्यंत आणि त्यानंतरही शुकशुकाट बघायला मिळाला. 

सकाळी फक्त दूध वाल्यांची वर्दळ रस्त्यात दिसत होती. विकेंड लॉकडाऊन असल्याने गाडगीळ पायटांगणातील भाजी बाजारही बंदच होता तर चितळे रोड, बनेसाब पटांगण येथे भरणारा भाजी बाजारही बंदच होता. शहरातील काही मोजकीच औषधाची दुकाने उघडी होती तर किराणामालाची काही दुकाने उघडी होती मात्र नागरिकांनी काल संध्याकाळीच जीवनावश्यक वस्तूंची खरेदी केल्याने याही दुकानांमधून शुकशुकाट दिसून येत होता. 

चितळेरोड

कापडबाजार

कापडबाजार चितळे रोड , सर्जेपुरा , मोचीगल्ली , घासगल्ली आदी रस्त्यांवरील व्यावसायिकांनी आपले व्यवहार बंद ठेऊन लॉकडाऊनला उत्स्फूर्त पाठिंबा दिल्याचे जाणवत होते तर भिंगारवाला चौक , दिल्ली दरवाजा आदी ठिकाणी पोलिसांची गस्त सुरु होती. मात्र रस्त्याने वर्दळ नसल्याने त्यांनाही फारसे काम उरले नव्हते . अशीच परिस्थिती सावेडी उपनगरातही दिसून आली.एकंदरीतच शहरात लॉकडाउनच्या निमित्ताने चांगलाच शुकशुकाट दिसून आला.              


Post a Comment

0 Comments