शासन नियमाप्रमाणे बेड च्या दराची आकारणी केली नाहीतर कारवाई

शासन नियमाप्रमाणे बेड च्या दराची आकारणी केली नाहीतर कारवाई 

 जिल्हाधिकारी :  मनसे च्या निवेदनाची ताबडतोब दखल 

वेब टीम नगर : मनसेची नितीन भुतारे यांनी आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन खाजगी हॉस्पिटल च्या माध्यमातून चाललेल्या लुटमार कडे लक्ष्य वेधले त्यावर त्यांनी तातडीने प्रतिक्रिया दिली जिल्हाधिकारी व महानगर पालिका आयुक्त यांच्या समिती व्दारे बिलाची चोकशी करणार व ताबडतोब समिती स्थापन करणार तसेच खाजगी हॉस्पिटल च्या डॉक्टरांच्या उपस्थितीत बैठक बोलावली जाईल रुग्णाला अॅडमिट करतांना डीपॉझिट रक्कम घेतली जाणार नाही असे आदेश देणार तसेच शासन नियमाप्रमाणे बिले बेड चे दर आकारले नाहीतर खाजगी हॉस्पिटल वर कारवाई करणार असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. 

त्यामुळे मनसेच्या निवेदनाची तातडीने दखल घेतल्यामुळे खाजगी हॉस्पिटल जिल्हाधिकारी यांच्या रडारवर आले आहेत. मनसेच्या मागणी मुळे खाजगी हॉस्पिटल मध्ये कोरोना आजारांवर उपचार घेणाऱ्या रूग्णांची सर्वसामान्य नागरिकांची लूटमार होणार नाही. त्यामुळे जनतेत नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments