जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या अध्यादेशास, व्यापाऱ्यांचा कडाडून विरोध : वंदे मातरम युवा प्रतिष्ठान

 जिल्हाधिकाऱ्यांनी  काढलेल्या अध्यादेशास, व्यापाऱ्यांचा कडाडून विरोध : वंदे मातरम युवा प्रतिष्ठान 

वेब टीम नगर : काल संध्याकाळी जिल्हाधिकाऱ्यांनी अध्यादेशादवारे अहमदनगर जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा या दिवसभर बंद राहणे बाबत आपल्या स्थरावर आदेश पारित करण्यात आलेले आहेत.  व्यापारी वर्गाला अन्यायाची वागणूक ही मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी दिलेली आहे. असे मत वंदे मातरम युवा प्रतिष्ठानने केली आहे.   

एकीकडे महाराष्ट्र शासनाने अध्यादेशाद्वारे व मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहना द्वारे संपूर्ण बाजारपेठ ही सोमवार ते शुक्रवार सकाळी ९:०० ते सायंकाळी ८:०० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याबाबत निर्णय दिलेला आहे आणि संपूर्ण लॉकडाऊन  हा केवळ शुक्रवार रात्री ८:०० वाजल्यापासून ते  सोमवार सकाळी ८:०० वाजेपर्यंत करण्यात आलेले आहे. तरीदेखील आपण आपल्या अध्यादेशादवारे तब्बल 25 दिवसांचा संपूर्ण लॉकडाउन पुकारून व बाजारपेठा दिवसभर बंद ठेवण्याच्या आदेश पारीत करुन, व्यापाऱ्यांवर अन्यायाची भूमिका अवलंबलेली आहे. तसेच आपण जिल्हाधिकारी या नात्याने पारीत केलेले आदेश हे मा. मुख्यमंत्र्यांच्या आदेशा विपरीत असुन त्यामाध्यमातुन आपण व्यापाऱ्यांनी आपल्या  अध्यादेशाचा  कडाडुन विरोध या निवेदनाव्दारे नोंदवित आहोत. 

     आज व्यापारी व व्यापारी यांच्या दुकानातील कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. ' गेल्या वेळेस पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊन मधून व्यापारी कसबसं सावरत असुन व अद्‌यापपावेतो सावरलेले नसून, व्यापार हे ठप्प झालेले असताना तसेच प्रत्येक व्यापाऱ्याला बँकांचे क्जापोटीचे हफ्ते,

व्याज, कामगारांचा पगार, टॅक्सेस, विज बिल त्याचप्रमाणे जे व्यापारी हे जागा भाझ्याने भाडेतत्त्वावर घेऊन व्यवसाय करीत आहेत त्यांना त्यांचे भाडे पोटी जी  रक्‍कम अदा करायची  आहे. ह्या सर्व बाबी कोणत्याही पद्धतीने थांबणार नसून आणि त्यात कुठलाही प्रकारचा आपल्या मार्फत दिलासा दिलेला नसल्याने व्यापारी हात जोडून आपणास कळकळीची विनंती करीत आहे की, व्यापाऱ्यांच्या व्यवसायासाठी आपला अध्यादेश तातडीने आणि त्वरित मागे घेण्यात यावा. त्याच प्रमाणे व्यापाऱ्यांचे वतीने आम्ही सर्व व्यापारी आपणास आमच्या असोसिएशन व प्रतिष्ठान मार्फत शाश्‍वती देतो की आम्ही सोशल डिस्टंसिंगचे सॅनिटायझर वापरचे आणि महाराष्ट्र शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करत आहोतच व पुढेही नियमांचे पालन करत आमचे व्यवसाय सुरू ठेवू.  

 व्यापाऱ्यांना व्यापार करण्याच्या दृष्टिकोनातून व त्यांच्या व्यवसायात कुठलीही बाधा येऊ नये या दृष्टीने, महाराष्ट्र शासनाच्या परीपत्रका नुसार सोमवार सकाळी ९:०० वाजेपासून तर शुक्रवारी संध्याकाळी ८:०० वाजेपर्यंत दुकान चालू ठेवण्याबाबत आपण आदेश पारित करून शुक्रवार, रात्री ८:०० वाजल्यापासून तर सोमवारी सकाळी ८:०० वाजेपर्यंत संपूर्ण पद्धतीने कडक लोकडाऊन करावा आणि त्यासाठी व्यापारी आपली संमती ही सदर अर्जाद्वारे व

निवेदनादवारे दर्शवित आहे. वरील सर्व मुद्दे व बाबी आम्ही नमूद केल्याप्रमाणे आमच्या मागण्या या तातडीने आपण स्वीकार करून, आपण काढलेला अध्यादेश हा तात्काळ स्वरूपाने रद्द करण्यात यावा. 


अन्यथा आम्हाला व्यापारी या नात्याने आंदोलन करण्यास आपण भाग पाडणार व त्यातून अनेक व्यापारी हे आपल्या जिवाचे बरे वाईट करुन घेतील ह्याची आपण नोंद घ्यावी. तरी तातडीने आमची एकमात्र विनंती, आपण आपले अध्यादेश मागे घ्यावा  व व्यापाऱ्यांवर होणाऱ्या, अन्याय थांबवावा.  असे आवाहनही वंदे मातरम युवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे .  

Post a Comment

0 Comments