राज्यात मिनी लॉकडाऊन ... हे आहेत नियम

राज्यात मिनी लॉकडाऊन 

दिवसा जमाव बंदी,तर रात्री संचारबंदी 

वेब टीम मुंबई : कोरोना विषाणूचा   झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने रात्री संचारबंदी तर  दिवसा जमावबंदी असे धोरण अवलंबत कठोर उपाययोजना लागू केल्या आहेत.  सोमवार रात्री आठ ते पासून 30 एप्रिल पर्यंत त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.  शेतीविषयक कामे, सार्वजनिक व खाजगी वाहतूक सुरळीतपणे सुरू राहील, खाजगी कार्यालय ,उपहारगृह, चित्रपटगृहे आदी गर्दीची ठिकाणे बंद राहतील. शुक्रवार रात्री  ते सोमवार सकाळपर्यंत असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन  लावण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.  यापुढे 'मिशन बिगिन अगेन'  ऐवजी 'ब्रेक द चेन ' या नावाने ही नियमावली लागू होईल सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत पाच पेक्षा अधिक  लोकांना एकत्र येण्यास तसेच रात्री आठ  ते सकाळी सात वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस बाहेर पडता येणार नाही.  यातून वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात येतील. 

 बागा चौपाट्या समुद्रकिनारे आधी सार्वजनिक ठिकाणी रात्री आठ ते सकाळी सात वाजेपर्यंत पुर्णता बंद राहतील दिवसा या सार्वजनिक ठिकाणी लोकांनी आरोग्याचे नियम न पाळता गर्दी केल्यास स्थानिक प्रशासन ते ठिकाण पूर्णपणे बंद करू शकते. 

खाजगी कार्यालयांनी पूर्णपणे वर्क फ्रॉम होम करणे बंधनकारक केवळ बँक,  स्टॉक मार्केट ,विमा, औषधी ,मेडिक्लेम ,दूरसंचार ,अशी वित्तीय सेवा देणारी संस्था तसेच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन वीज,पाणीपुरवठा करणारी कार्यालय सुरू राहतील.  तर इतर शासकीय कार्यालय ५० टक्के उपस्थितीत सुरू राहणार आहेत.  शासकीय कार्यालयात अभ्यागताना प्रवेश नसेल.  आवश्यक असेल तेथे कार्यालय किंवा विभागप्रमुखाचा पास लागेल.  कार्यालयातील बैठक ऑनलाईन घ्यावयात .  सार्वजनिक व खासगी बसमध्ये उभे राहून प्रवास करता येणार नाही आसनावर  वर बसलेल्या प्रवाशांनाच परवानगी आहे.  रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खाद्य विक्रेत्यांना सकाळी सात ते रात्री आठ केवळ पार्सल सेवेसाठी व्यवसाय सुरू ठेवता येतील .  होम डिलिव्हरी देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे.  अन्यथा त्या व्यक्तीस एक हजार रुपये व संबंधित दुकान किंवा संस्थेत दहा हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल.  सार्वजनिक व खासगी अशी सर्व प्रकारची वाहतूक सुरूच राहील रिक्षा चालक व टॅक्सीत निश्चित केलेल्या प्रवाशांपैकी प्रवासी प्रवास करू शकतील.  वृत्तपत्र छपाई आणि वितरण सुरू ठेवता येतील मात्र विक्रेत्यांनी लसीकरण करून घ्यावे.  चालक वाहक व कर्मचारी यांनी लसीकरण पूर्ण करावे प्रमाणपत्र बाळगावे .  

           बाहेर जाणाऱ्या रेल्वे मध्ये सर्वसाधारण  प्रवासी असू नयेत तसेच प्रवाशांनी मास्क घातलेले असावे . अत्यावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व प्रकारची दुकाने मॉल्स बाजारपेठा ३० एप्रिल पर्यंत बंद . मनोरंजन व करमणुकीची स्थळे ,चित्रपटगृहे ,मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे ,व्हिडीओ पार्लर्स, क्लब ,जलतरण तलाव, क्रीडा संकुले, सभागृह, वॉटर पार्क ,सर्व कटिंग सलून, ब्युटी पार्लर ,स्पा ,सर्व धर्मीयांचीस्थळे प्रार्थनास्थळे बाहेरून येणारे भक्त व दर्शनार्थी साठी बंद राहतील ,मात्र या ठिकाणी काम करणारे कर्मचारी पुजारी यांना दैनंदिन पूजा आरक्षण करता येईल.  शाळा महाविद्यालय बंद राहतील मात्र दहावी व बारावी परीक्षांचा अपवाद असेल, सर्व खाजगी क्लासेस बंद राहतील . देशभरात गेल्या चोवीस तासात कोरूना बाधितांचा आकडा ९३ हजार ३४९ वर पोहोचला तर महाराष्ट्रात रविवारी दिवसभरात ५७ हजार रुग्णांची नोंद झाली आहे. 

Post a Comment

0 Comments