आरोग्य आहार : लाल भोपळ्याचे भरीत

 आरोग्य आहार : लाल भोपळ्याचे भरीत 

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

लाल भोपळा खाण्यात चविष्ट असतो आणि आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. आपण लाल भोपळ्याच्या बऱ्याच रेसिपी तयार करू शकतो .आज आपण लाल भोपळ्याचे भरीत कसे बनवाचे जाणून घेऊ या.चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घ्या.

साहित्य- २ कप लाल भोपळा, २ अक्ख्या लाल मिरच्या,१/२ लहान चमचा मेथी दाना,१लहान चमचा धणे पूड,१/२ लहान चमचा हळद, १ लहान चमचा गरम मसाला,१ मोठा चमचा तेल.मीठ चवीप्रमाणे.

कृती- सर्वप्रथम लालभोपळा सोलून बारीक चिरून घ्या. आता एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यात लालभोपळ्याचे तुकडे टाकून उकळवून घ्या. चांगले उकळले की त्यातील पाणी काढून लालभोपळा थंड करून मॅश करून घ्या.

आता एका कढईत तेल गरम करा या मध्ये मेथीदाणे, आणि अक्खी लालमिरीची ची फोडणी तयार करा.यामध्ये हळद,गरम मसाला,धणेपूड घालून परतून घ्या. कढईत मॅश केलेला लालभोपळा घाला आणि चांगले मिसळा. एक वाफ घ्या आणि गरम लाल भोपळ्याचे भरीत पोळी सह सर्व्ह करा.



Post a Comment

0 Comments