बहिरवाडीत जोगेश्वरी ग्रामसंघाच्या वतीने महिला दिन साजरी

 बहिरवाडीत जोगेश्वरी ग्रामसंघाच्या वतीने महिला दिन साजरी 


वेब टीम नगर : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत बहिरवाडी येथे जोगेश्वरी महिला ग्रामसंघाच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.  तसेच यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी जागतिक महिला दिन ८ मार्च पासून ते ५ जून २०२१ या कालावधीत महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियानाचा शुभारंभ तसेच अभियाना संदर्भात जनजागृती करण्यात आली.तसेच उमेद अभियाना च्या अंतर्गत सामाजिक समावेशन, आर्थिक समावेशन, क्षमता बांधणी व शाश्वत उपजीविका बाबत महिलांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

सदर कार्यक्रमासाठी माननीय सचिन घाडगे गटविकास अधिकारी पंचायत समिती नगर यांचे मार्गदर्शन लाभले या कार्यक्रमासाठी गोविंद (अण्णा ) मोकाटे जिल्हा परिषद सदस्य नगर, अंजना ताई येवले सरपंच बहिरवाडी तसेच ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पाराजी दारकुंडे,अलका अरुण काळे तालुका व्यवस्थापक अंबादास सगर यांनी उपस्थित राहून महिलांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे नियोजिका ज्योती काळे (C.R.P) बहिरवाडी व जोगेश्वरी ग्राम संघातील महिला यांनी केले. Post a Comment

0 Comments